तरुण भारत

मर्क्स आणि माइंड ट्री संघाचे विजय

पुणे / प्रतिनिधी  :    

मर्क्स आणि माइंडट्री या संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवडच्या टेल्को मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत मर्क्स संघाने स्प्रिंजर नेचर संघावर ५९ धावांनी मात केली. यात मर्क्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६४ धावा केल्या. तळाच्या आनंदराव यादव आणि दिनेश वाडकरच्या फटकेबाजीच्या जोरावर मर्क्स संघाला १६० धावांचा टप्पा ओलांडता आला. आनंदरावने ३१ चेंडूंत ४१, तर  दिनेशने १३ चेंडूंत ३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना स्प्रिंजर नेचर संघाला ८ बाद १०५ धावा करता आल्या. 
यानंतर दुसऱया लढतीत उदय गलांडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर माइंडट्री संघाने अल्टिअस डाटा संघावर १०५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. माइंडट्री संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७८ धावा केल्या. यात उदय गलांडेने ४५ चेंडूंत ५४, तर दीपांशू चौधरीने ४५ चेंडूंत ४७ धावा केल्या. या जोडीने १११ धावांची सलामी दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना अल्टिअस डाटा संघाचा डाव ७३ धावांतच गारद झाला.

Related Stories

होबार्ट हरिकेन्सची विजयी सलामी

Patil_p

जलतरणपटू साजन प्रकाश थायलंडमध्ये सुखरूप

Patil_p

नदाल, सित्सिपस, बार्टी, केनिन दुसऱया फेरीत, अझारेंका पराभूत

Patil_p

मुरलीसोबत डिनर डेटसाठी एलिस पेरीचा होकार, पण…

Patil_p

कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी गंभीरची आणखी एक कोटीची मदत

tarunbharat

मोटो जीपीच्या शर्यती रद्द

Patil_p
error: Content is protected !!