तरुण भारत

कार्लोस घोसानचे पलायन

‘अलिबाबा’ या जगप्रसिद्ध व बलाढय़ कंपनीचा सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जॅक मा हा सप्टेंबर 2018 मध्ये या पदावरून स्वखुषीने निवृत्त झाला. 1999 साली स्थापन झालेल्या आणि इ. कॉमर्स व डिजिटल पेमेंट पद्धतीत पाहता पाहता जगविख्यात झालेल्या ‘अलिबाबा’ कंपनीचा अध्वर्यू वयाच्या पन्नाशीतच निवृत्त होत आहे. या बातमीने त्या काळात जगभरात एकच खळबळ माजली. मात्र उद्योग क्षेत्रात दंतकथा बनून राहिलेल्या जॅक मा ने निवृत्तीसाठी जे स्पष्टीकरण दिले त्यातून याची प्रतिमा अधिकच उजळून निघाली. तो म्हणाला, ‘मी माझ्या आयुष्यातील 29 वर्षे कंपनीला दिली. आता या कंपनीत नवतरुणांच्या अभिनव कल्पनांना वाव मिळायला हवा. नवे नेतृत्व पुढे यावयास हवे. अशावेळी आमच्यासारख्यांनी जागा अडवून बसणे योग्य होणार नाही. कंपनीचा अधिक विकास व्हायचा असेल, ती अधिक दीर्घकाळ चालायची असेल तर नव्या पिढीसाठी नेतृत्व बदल होणेच योग्य आहे. या विचारानेच मी या पदावरून निवृत्त होत आहे’ अर्थात अशा रीतीने सार्थकापर्यंत पोहचून निवृत्त होणारा जॅक मा हा काही जगातील एकमेव उद्योजक नाही. इतर उद्योजकांनीही असाच करिष्मा दाखवून उद्योगाचे नाव उज्ज्वल करून ऐन यशोशिखरावर असतानाच निवृत्ती घेऊन चाहत्यांना अचंबित केले आहे. उद्योग जगतात आजही त्यांची नावे कौतुकाने घेतली जातात. कारण समाजासमोर त्यानी काही एक असा आदर्श निर्माण केलेला असतो. अत्यंत सुखासिन, संपन्न असे जीवन, मिळणारी प्रति÷ा, वलय मानमरातब त्याचबरोबर नव्या संकल्पना प्रत्यक्ष साकार करताना घेतलेली प्रचंड मेहनत असे विविध आयाम यशस्वी उद्योजकांना लाभलेले असतात. तथापि, या साऱयाची सवय वा लालसा इतकी जीवघेणी असते की यशस्वितेच्या शिखरावर असतानाच निवृत्त होऊन आपल्या आवडीच्या इतर उपक्रमात रमणे हेच मुळी या क्षेत्रात वैराग्याचे लक्षण ठरते. म्हणूनच अशा उद्योजकांबाबतचा आदर जनमानसात कायम असतो.

तथापि, उद्योगविश्वात प्रचंड बुद्धिमत्ता, कार्यक्षमता, चाणाक्षपणा व धाडस असलेले असेही बडे उद्योजक आहेत की जे पतसंस्था, गुंतवणूकदार, ग्राहकवर्ग, कामगार, पाठिंबा देणारा देश यांना हातोहात फसवून अंतिमतः गुन्हेगार ठरतात. आपल्या देशातच विजय मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी ही अशा प्रवृत्तीच्या उद्योजकांची नावे आहेत. इतर देशातही याच प्रवृत्तीचे अनेक उद्योजक दिसून येतात. या साऱया पार्श्वभूमीवर, अगदी अलीकडेच एका अधिकारी व जगप्रसिद्ध उद्योग क्षेत्रातील क्यक्तीची या मांदियाळीत भर पडली आहे. त्याचे नाव आहे कार्लोस घोसान.

Advertisements

कार्लोस घोसान हा बराच काळ रेनॉल्ट-निस्सान या कार उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य व जगप्रसिद्ध कंपनीचा प्रमुख होता. तत्पूर्वी आपल्या अफाट कल्पनाशक्ती व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने मिशीलिन नॉर्थ अमेरिका, रेनॉल्ट, ऍटो वाझ, निस्सान व मित्सुबुशी या बडय़ा कंपन्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष म्हणून यशस्वी व देदीम्यमान कामगिरी केली होती. कालांतराने रेनॉल्ट-निस्सान-मित्सबुशी या फ्रेंच व जपानी कंपन्यांनी युतीतून संयुक्तपणे वाहनांचे उत्पादन सुरू केले. वाहन उत्पादन क्षेत्रातील या महाआघाडीचा कार्लोस घोसान हा मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षही बनला.

कार्लोस घोसान हा इंजिनिअरिंगमधील पदवी घेतल्यापासूनच उद्योग क्षेत्रात होता. आरंभी मध्यम उद्योगातील कुशल व कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून तो प्रसिद्धीस आला. काही नावाजलेल्या कंपन्यांचे अध्यक्षपद त्याने भूषविले. 1996 च्या सुमारास फ्रेंच कंपनी रेनॉल्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस स्वाईत्झरने आपला सहकारी म्हणून कार्लोसला पाचारण केले. या सेवेसाठी भर भक्कम रकमेचे पॅकेजही देऊ केले. या सुमारास रेनॉल्ट ही कधी काळी उर्जितावस्थेतील वाहन उत्पादक कंपनी पार डबघाईस आली होती. अक्षरशः दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर होती. या परिस्थितीतून कंपनीस बाहेर काढण्यासाठीच कार्लोसच्या नेमणुकीचा जुगार खेळण्यात आला होता. नव्या संकल्पना राबवणारे उद्योगक्षेत्रातील उदयोन्मुख नाव ही पार्श्वभूमी कार्लोसला होतीच. रेनॉल्टमधील नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर लागलीच कार्लोस घोसानने खर्च कपात, कामगार कपात, नवी उत्पादन पद्धत, नव्या प्रक्रिया, सुट्टय़ा भागांच्या गुणवत्तेत वाढ, सातत्याने नवनवी नमुन्यांची वाहने उत्पादित करणे इत्यादी संकल्पना कसोशीने राबवून कंपनीस पुन्हा प्रगतीपथावर आणले. यानंतर वाहननिर्मिती उद्योगात त्याला ‘ला कॉस्ट किलर’ व ‘मिस्टर फिक्स इट’ ही कौतुकास्पद टोपण नावेही मिळाली. खरे तर ही टोपण नावे त्याला निस्सान या जपानी कंपनीत रेनॉल्ट सोडून रूजू झाल्यानंतर मिळाली. नुकसानीत आलेल्या व संकटग्रसत स्थितील निस्सानलाही त्याने आपल्या अध्यक्षतेखाली पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले. त्यानंतर तो रेनॉल्ट-निस्सान या संयुक्त कंपनीच्या प्रमुखपदी कार्य करू लागला मात्र आपल्या कार्यकाळात त्याने कंपनीच्या पैशांचा गैरवापर केला, स्वतःच्या सहलीसाठी व अनेक देशातील निवासासाठी कंपनीचा निधी अधिकृतपणे वापरला. पैशांचा गैरव्यवहार व प्रचंड अफरातफर केली असे आरोप होऊन त्याला प्रमुख पदावरून हटवण्यात आले. त्याच्या कथित गैरव्यवहाराबाबत त्याच्यावर खटलाही घालण्यात आला. अक्षरशः अब्जावधी डॉलर्सच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल करण्यात आला. जपानमध्ये त्याला अटकेत व स्थानबद्धतेत राहावे sलागले. फ्रान्समध्येही गैरव्यवहाराबाबत त्याची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी दरम्यान सध्या जपानमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या कडक नजरेखाली घरात स्थानबद्ध असलेला घोसान 31 डिसेंबर रोजी सुरक्षा यंत्रणेच्या हाती तुरी देऊन फरार झाला. तो आपल्या मूळ देशात लेबनॉनमध्ये असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जपान व लेबनॉन इंटरपोल त्याच्या अटकेसाठी प्रयत्नशील आहेत. परंतु जपानचा लेबनॉनशी प्रत्यार्पण करार नसल्याने त्याला ताब्यात घेणे जपानी यंत्रणेला अशक्मय बनले आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तर नुकसान भरपाईसह पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ त्याला तुरुंगवासात काढावे लगातील असे निरीक्षकांचे मत आहे. फ्रान्समध्येही त्याच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. मात्र जपानी न्याययंत्रणा आपल्याशी सूडभावनेने वागत आहे आणि पूर्वनियोजित जाळय़ात आपणास अडकवण्यात येत आहे. असा आरोप लेबनॉनमधून कार्लोसने केला आहे. एकूण कार्लोसची कारकीर्द, त्याचा प्रचंड गैरव्यवहार, त्याच्यावरील चौकशी व खटला आणि त्याचे नाटय़मय पलायन या घटनांमुळे उद्योगविश्वात मोठीच खळबळ उडवूनदिली आहे.

अनिल आजगावकर

Related Stories

एकमेकांची अंतःकरणे सांभाळणे खूप गरजेचे

Patil_p

हाताचे सहावे बोट!

Patil_p

दृष्टीहीन विकासाचे प्रकल्प

Omkar B

केली उत्पन्न विष्णुमाया

Patil_p

कृषी व्यवस्थेतील आधुनिक कौशल्ये

Patil_p

वीस लाख कोटी पॅकेजचा परिणाम

Patil_p
error: Content is protected !!