तरुण भारत

कृषी तंत्रज्ञानाची हरित क्रांती

कृषी तंत्रज्ञानाची वर्गवारी अनेक गटामध्ये केली जाते. पूर्वीच्या पारंपरिक तंत्रज्ञानामध्ये जीवशास्त्रीय तंत्रज्ञान (बियाणे व किडनाशके) यांत्रिक तंत्रज्ञान (टॅक्टर, मळणी यंत्र इ.) सिंचन तंत्रज्ञान आणि सुगीपश्चात तंत्रज्ञान अशी वर्गवारी केली जात होती. अलीकडे जैवतंत्रज्ञान, जीओ क्रिस्पर कॅस-9, अचूक निदानाचे तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, सुदूर संवेदन तंत्रज्ञान, कृत्रिम बौद्धिक तंत्रज्ञान, आयटी तंत्रज्ञान हे कृषी उत्पादनासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. पीक संरक्षणासाठी जैविक व शाश्वत तंत्रज्ञान, पौष्टिक आहाराचे कृषी तंत्रज्ञान, ऍग्रिहॉर्टि-लिव्ह स्टॉक तंत्रज्ञान, आधुनिक सूक्ष्म, तुषार व ठिबक सिंचन तंत्रज्ञान, वाफ तंत्रज्ञानाची सिंचन सुविधा, दुष्काळ सोशक पीक संरचना यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सध्या स्वीकार होतो. ऍग्रिकल्चरल बॉयोलॉजी हा एक व्यापक विषय आहे. कलमे, उती संवर्धन, हायब्रीड, कार्बन शेती, हय़ूमस टिकविणे, मल्चिंग आणि वन वाणाची रोपे व बियाणे अशा घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. जिवाणू संवर्धन आणि मृद् आरोग्य यामध्ये अनेक नवे प्रकार बाजारात येत आहेत. म्युटेशन बॉयोलॉजीद्वारे डीएनए व आरएनएच्या अनेक श्रेणीमध्ये बदल घडवून आणण्याचे क्रिस्पर कॅस-तंत्रज्ञान हे अलीकडे शेतीला वरदान ठरत आहे. अलीकडे मानवी स्वभाव बदलण्याच्या मेडिकल रिसर्चमध्येदेखील अशा तंत्रज्ञानाचा स्वीकार होत आहे. अनेक रोगावर यामुळे मात करता येते. त्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंग, मोलेक्मयुलर मार्कर, मोलेक्मयुलर डायग्नोस्टिक, व्हॅक्सिन अशा अनेक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकारची नवी अन्न साखळी निर्माण करता येते. माणूस, जनावरे व पक्षी यांच्यासाठी नव्या खाद्य व चाऱयाच्या वाणांची निर्मिती सहज शक्मय होत आहे. त्यामुळे शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, झिरो बजेटिंग, न्युट्री फार्मिंग न्यूट्रसिटिकल फूड यासारख्या अत्याधुनिक कृषी तंत्राने नवी हरित क्रांती निर्माण होत आहे.

येत्या दहा वर्षामध्ये कृषी तंत्रज्ञानाची क्रांती घडून येणार आहे. यंत्राच्या वापरामुळे उत्पादन सुलभ व गुणवत्तेच्या श्रेणीतील धान्याची निर्मिती जलद होऊ शकते. ट्रोन व रोबोटच्या साहाय्याने पीक संरक्षण व पाहणी केली जाते. तपमान व आर्द्रता मोजणारे सेन्सॉर, एरियल इमेजिस, जीएसपी थील्ड मॅपिंग, विड मॅपिंग, वॉटर क्वॉलिटी, व्हेरेबल फर्टिलायझर ऍप्लिकेशन अशा अनेक यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामध्ये नॅनो-तंत्रज्ञानाचा वापर अनेक कृषी विकासाच्या टप्प्यामध्ये होत आहे. सिन्थेटिक अन्न अटोमेशन आणि अभियांत्रिकी गटामध्ये क्रांती घडत आहे. विविध प्रकारच्या सेन्सॉरमुळे माती, पाणी आणि हवामानाच्या संतुलनाचा अभ्यास सुलभ होतो आहे. इक्विपमेंट टेलेमॅट्रिक्स पद्धतीने यंत्रातील बिघाडांची जाणीव अगोदर होऊ शकते. विविध कार्याच्या सेन्सॉरचे नियंत्रण एखादा रोबोट ठेवू शकतो. त्यासाठी फार्म स्वॅर्म प्लॅटफॉर्मवरून हे सर्व हाताळता येते. लाईव्ह-स्टॉक बायोमेट्रिक पद्धतीने जीपीएस, आरएफआयडी आणि बायो मॅट्रिकच्या संयुक्त सहकार्याने जनावरांच्या माहितीची एकत्रित साठवणूक होऊ शकते. 2020 पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात येईल. क्रॉप सेन्सॉरच्या साहाय्याने शेतातील तण, खत आणि इतर अन्न-घटकांची माहिती पीक लागवडी अगोदरच उपलब्ध होऊ शकते. याच्यातील असंतुलित स्थितीमध्ये काय करावे याची माहिती उपलब्ध होऊ शकते. ऑप्टिकल सेन्सॉर व द्रोणच्या इन्फ्रा-रेडलाईटच्या साहाय्याने पिकांचे आरोग्य तपासता येते. इन्फ्रास्ट्रक्चरल हेल्थ सेन्सॉरद्वारे जुनी इमारत पूल अथवा फॅक्टरी, शेती व इतर क्षेत्रांची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. ते किती जीर्ण झाले आहेत हे कळू शकते. यासंबंधीचे संशोधन 2021 ला पूर्ण होईल आणि 2027 पर्यंत ते तंत्र बाजारात येईल. जेनेटिक डिझाईन्ड फूड मालेतील अभियांत्रिकी तंत्रज्ञानाने जैविक आणि शारीरिक भूक, स्ट्रेन व थकवा घालविण्यासाठीचे अन्न-घटक निर्माण करता येतात. 2022 मध्ये हे तंत्र बाजारात येईल. पिकावर अथवा ठरावीक भौगोलिक परिसरावर पडणाऱया रोगांचे निदान करणे, त्यावर इलाज सुचविणे आता सोपे होणार आहे. शेतकरी बऱयाचवेळी खत, पाणी व औषधांच्या मात्रेचे ओव्हरडोस अथवा ओव्हर लॅपिंग डोस देतो. त्यासंबंधीची माहिती शेतकऱयांना मिळू शकते. त्यासाठी विविध प्रकारच्या टॅक्टर उपकरणांचा आणि रोबोंचा वापर करावा लागतो. मळणी, कापणी, पेरणी, फवारणी, तण काढणे, पाणी देणे यासारख्या कामासाठी कृषी-रोबोंचा वापर सुरू झाला आहे. पण सर्वसामान्य शेतकऱयाला परवडेल अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. कृषी रोबोंना अनेक मायक्रोस्कोपिक सेन्सॉर जोडून सर्व रोबोंचे कार्य एकत्रितपणे नियंत्रित करता येते. मानवी हस्तक्षेपाची त्याला गरज भासणार नाही. ते स्वतः सर्व गोष्टी नियंत्रित करतील आणि अचूक निदानही करतील, रिमोट सेन्सिंगद्वारे अचून निदानाची शेती करता येते. माहिती संकलन, विश्लेषण व भविष्यातील अनेक घटना जाणून घेता येतात. हवामानातील बदल लक्षात येतील. त्यासाठी काय करावे हे सुद्धा लक्षात येते. शेत-जमिनीची गुणवत्ता तपासून तिची गुणवत्ता अबाधित कशी ठेवता येईल यासंबंधीची अचूक माहिती संकलित करून अचूक निदानाची शेती कसता येते. सॉईल सेन्सॉर स्टेशन, नेस्ट कॅमेरा, रिंग डुअर बेल जीएसआय वाच डॉग कंट्रोलर यासारख्या ऍगटेक कृषी उपकरणांचा वापर होऊ शकतो. द्रोणद्वारे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देता येते.

Advertisements

 जैव तंत्रज्ञानाची क्रांती घरोघरी पोचविली जात आहे. ऊती संवर्धन तंत्रज्ञान, डीएनए, आरएनए तंत्रज्ञानाद्वारे जीएम पिके निर्माण करता येतात. क्रिस्पर कॅस-9 द्वारे पिकामध्ये हवा तो स्वाद, सत्व, चव आणता येते. जेनेटिक म्युटेशन पद्धतीने वेगवेगळय़ा रंगाच्या गाजराचे उत्पादन करता येते. कापसाचे नैसर्गिक रंगसुद्धा बदलता येतात.

सिंथेटिक बायोलॉजीचे (सिनबायो) महत्त्व वाढत आहे. 2018 मध्ये त्याचा 16 अब्ज डॉलरचा व्यवसाय झाला. इंटरनॅशनल जेनेटिक इंजिनिअर मशीन बनविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्याला आय-जेम म्हणून संबोधले जाते. यामुळे नवी जीवशास्त्रीय प्रणाली जन्माला येईल. जनावराशिवाय तूप, लोणी, दही तयार करता येते. बे-एरिया या कंपनीने सॅफ्रॉन व्हॅमिलीन आणि स्टे†िव्हया तयार करायला सुरुवात झाली आहे. सोलाझिमे या कंपनीने इंजिनिअरिंग अल्गलचा वापर करून बटर, प्रोटिन रिच फ्लोअर आणि वेगन प्रोटिन्स बनवायला सुरुवात केली आहे. तसेच नवीन मायक्रोब्स माती व मुळामध्ये घालता येतात का यावर संशोधन सुरू केले आहे.

 डॉ. वसंतराव जुगळे

Related Stories

कारभार आणि कारभारी!

Patil_p

रणमदाची उठी उतरली

Omkar B

लेडी धुंडीराज

Patil_p

चक्रव्यूह आणि तीन वाटा

Omkar B

व्यवस्थापनशास्त्र मानवी व्यवहारावर आधारित

Patil_p

चीनची लबाडी

Patil_p
error: Content is protected !!