तरुण भारत

हय़ुंदाई 2025 पर्यंत 44 ई-वाहने सादर करण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हय़ुंदाई मोटार समूहाकडून आगामी 2025पर्यंत इलेक्ट्रिक क्षेत्रातील तब्बल 44 वाहने सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये प्रामुख्याने 13 हायब्रिड, 6 प्लग-इन-हायब्रिड, 23 बॅटरी इलेक्ट्रिक आणि दोन इंधनावर आधारीत वाहनांचा समावेश नवीन वाहनांच्या सादरीकरणात करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisements

या व्यतिरिक्त हय़ुंदाई मोटार नवीन ईव्ही आर्किटेक्चर विकसित करत आहे.  त्याला 2024 पर्यंत तयार करण्यात येणार आहे. यात कंपनी आगामी पाच वर्षांत तब्बल 100 ट्रिलियन कोरियन वोन(6.14 लाख कोटी रुपये) खर्च करणार आहे. हा खर्च वर्षाच्या आधारावर 20 ट्रिलियन कोरियन वोन(1.22 लाख कोटी रुपये) होणार आहे.  

इलेक्ट्रीसिटीचे उत्पादन आणि स्टोरेजवर लक्ष

कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांसाठी विशेष योजना लागू करणार आहे. तर अन्य घटकांमधून मजबूतीसोबत प्रकल्प उभारणार असल्याची तयारी कंपनी करत असल्याचे हय़ुंदाई मोटारचे कार्यकारी उपाध्यक्ष यूइसुन चुंग यांनी म्हटले आहे. 

कॅब शेअरिंग सेवा

कंपनी आगामी 2030 पर्यंत 2 लाख इंजनवर आधारीत वाहनांची डिलिव्हरी करणार आहे. तर यांची मदत घेत 2020 मध्ये हय़ुंदाई समूह इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी एसयूव्ही आणि किया सोरेन्टो, हय़ुंदाई टय़ूस्कोन आणि सान्टा या सारखे मॉडेल बाजारात उतरवणार आहे. यांची मदत घेत कंपनी कॅब सेवेत आपली वाहने उतरवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

शेअर बाजारात सेन्सेक्सची 320अंकाची उसळी

Patil_p

जानेवारीत कोल इंडियाचे उत्पादन वाढले

Patil_p

लॉकडाउनच्या काळात प्रीपेड प्लॅनची मर्यादा वाढवा : ट्राय

Patil_p

‘मायक्रोसॉफ्ट’ तिमाहीत नफ्यामध्ये

Patil_p

एसबीआयची नवी योजना सादर

Patil_p

जुलै-सप्टेंबरमध्ये डीएचएफएल तोटय़ात

Patil_p
error: Content is protected !!