तरुण भारत

10 वर्षांत बाटा इंडियाच्या समभागांचा 1600 टक्के परतावा

वृत्तसंस्था/ मुंबई

शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक वेळ योग्य फायदा न मिळाल्यास काही जण देशोधडीला लागतात, तर काहीजण कोटय़ाधीश होतात. यातच जर एखाद्या समभागांनी अंदाजापेक्षा अधिकचा परतावा दिल्यास यासारखी दिलासा देणारी बाब गुंतवणूकदारांसाठी दुसरी कोणती असणार आहे. सध्या फुटवेअर उद्योगातील आघाडीची कंपनी ‘बाटा इंडिया’च्या समभागांनी मागील 10 वर्षांत जवळपास 1600 टक्क्यांची वाढ नोंदवत शेअर बाजार अभ्यासकांना मोठा धक्का दिला आहे. 2009 ते 2019 या 10 वर्षांतील कालावधीत बाटा इंडियाचे समभागांनी गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा देत धनाढय़ केले आहे. फुटवेअर उद्योगातील आघाडीची कंपनी असलेल्या बाटा इंडियाच्या समभागाने 1661 टक्के वाढ नोंदवली आहे. बाटाचे फुटवेअर क्षेत्रातील सध्याचे वर्चस्व पाहता आगामी काळात आणखीन वधारण्याची शक्यता तज्ञांच्या माहितीमधून मांडली आहे.  बाटाच्या समभागांनी पाच वर्षांत 168.12 टक्के परतावा दिला आहे. तर तीन वर्षात तो 290 टक्क्यांनी वाढल्याची नोंद असून एका वर्षात समभागात 54.44 टक्के वाढ झाल्याची माहिती आहे.

Advertisements

आगामी वाटचाल

भविष्यात कंपनी विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. यामध्ये 2019-2022 या वर्षात कंपनीचा महसूल अनुक्रमे 11, 16 आणि 20 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज आहे.

Related Stories

रेलमी ‘सी-3’चे सादरीकरण फेबुवारीत

Patil_p

अमेरिका-इराण संघर्षाचे बाजारावर पडसाद

Patil_p

भारताची पाम तेल आयात घटली

Patil_p

RIL AGM 2021 : ‘जिओ फोन नेक्स्ट’ गणेश चतुर्थीला येणार : मुकेश अंबानी

pradnya p

SBI कडून व्याजदरात कपात

datta jadhav

विक्रमी स्तरावरून सेन्सेक्स 416 अंकांनी घसरला

Patil_p
error: Content is protected !!