तरुण भारत

अनगोळमधील अनधिकृत लेआऊट हटविले

बुडाने केली कारवाई, पुन्हा धडक मोहिमेस प्रारंभ

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

बुडा व्याप्तीमधील अनधिकृत लेआऊट हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मध्यंतरी ही कारवाई थांबली होती. पण आता या कारवाईस पुन्हा प्रारंभ करण्यात आला असून शुक्रवारी अनगोळ परिसरातील अनधिकृत लेआऊटवर कारवाई करण्यात आली.

एनए केल्यानंतर लेआऊट न करताच भूखंड तयार करून जागा विक्री करण्यात येत आहे. अनधिकृत वसाहतींना ब्रेक लावण्यासाठी अनधिकृत लेआऊट हटविण्याची कारवाई बुडा प्रशासनाने हाती घेतली आहे. यापूर्वी विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत लेआऊट्सवर कारवाई करण्यात आली होती. मात्र दिवाळी दरम्यान या मोहिमेला ब्रेक लागला होता. आता पुन्हा सदर मोहीम धडकपणे राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अनधिकृत लेआऊटचा शोध घेऊन यादी करण्यात आली असून, 30 हून अधिक अनधिकृत लेआऊट्सचे काम सुरू असल्याचे बुडाच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वी 15 लेआऊट्समधील रस्ते व संरक्षक भिंती हटविण्यात आल्या होत्या. अनधिकृत लेआऊट करू नये अशी नोटीस बजावूनही अनधिकृत लेआऊट करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे शुक्रवारी अनगोळ परिसरात मोहीम राबवून अनधिकृत लेआऊट हटविण्यात आले.

 या परिसरात लहान-लहान रहिवासी वसाहती निर्माण होत आहेत. अरूंद रस्ते आणि नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी देखील वसाहती निर्माण होत आहेत. काही वसाहतींमध्ये पावसाळय़ात पाणी भरून नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल बनले होते. या वसाहतींचा पसारा वाढू नये याकरिता बुडा प्रशासनाने ही मोहीम पुन्हा हाती घेतली आहे.

यावेळी बुडाचे नगरयोजना अधिकारी ए. एस. कांबळे, कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ, साहाय्यक अभियंते सचिन कांबळे आदींसह बुडाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

उद्यमबाग परिसरातील समस्यांना वाली कोण?

Amit Kulkarni

कार्यकारिणी बैठकीसाठी भाजपचे बडे नेते बेळगावात

Patil_p

विवेकानंद सोसायटीची कोरोना काळातही कौतुकास्पद कामगिरी

Patil_p

कणबर्गी येथील पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात

Patil_p

आधार नोंदणीसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी

Patil_p

एक हात नसताना लढणाऱया राजेश्वरी हिरेमठ

Patil_p
error: Content is protected !!