तरुण भारत

म्हासुर्ली-चौधरवाडी बंधारा बनला मृत्युचा सापळा

म्हासुर्ली/वार्ताहर

नवीन प्रस्तावित असणाऱ्या बेळगावगोवा या आंतरराज्य मार्गावरील म्हासुर्ली (ता.राधानगरी) ते चौधरवाडी (ता.गगनबावडा) हा अवघ्या अर्धा किमीच्या रस्त्यासह नदीवरील नियोजित पुलाकडे शासनाच्या सर्वच विभागानीं दुर्लक्ष केले आहे. परिणामी सध्या या रस्त्यासह कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक कोकण व गगनबावडा तालुक्यात होत असून बंधारा मृत्युचा सापळा बनला आहे.

Advertisements

म्हासुर्ली ते चौधरवाडी रस्ता दोन तालुके जोडणारा असून सुमारे अर्धा किमीचा रस्ता आंतरराज्य रस्त्यातीलच एक भाग असला तरी अजूनही शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

बेळगावनिपाणी ते परितेराशिवडेचांदेकोते मार्गे म्हासुर्लीधुंदवडे अणदूर मार्गे गगनबावडा ते कोकण गोवा असा कमी अंतराचा नवीन रस्ता प्रस्तावित असून त्यास कोट्यावधी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे या मार्गावर काही ठिकाणी कामे ही सुरु झाली आहेत. याच मुख्य रस्त्यावरील म्हासुर्ली बाजारपेठ ते चौधरीवाडी अशा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता याला अपवाद ठरला असून शासनाच्या संबंधित विभागाने गार्भियाने घेतले नसल्याने रस्ता पूर्णतः माती मधील कच्या स्वरुपात अरूंद अस्तित्वात आहे. परिणामी रस्ता वाहतूकीच्या दृष्टीने धोक्याचा बनला आहे. तर नदीवरही मोठा उंचीचा पूल नसल्याने सध्या पाटबंधारे विभागाच्या अरुंद अशा कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरून जीवघेणी वाहतूक कोकण व गगनबावडा तसेच पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील साखर कारखान्याकडे सुरु आहे.

पावसाळ्यात तर सदर रस्तावरून पावसाचे मोठ्या प्रमाणावर वाहणारे पाणी , दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडे झुडपे, तसेच चिखल आणि मोठमोठे खड्डे यामुळे वाहतुक चार महिने बंद पडते. तसेच पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे या रस्त्याचा काही भाग खचू गेला आहे. त्यामुळे खड्याचे साम्राज निर्माण झाल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदच नसल्याची माहिती पुढे आली आहे .

Related Stories

क्षारपड जमीनमुक्तीचा पॅटर्न राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्न करु – राज्यकृषी सचिव डवले

Abhijeet Shinde

कोल्हापुरातील रामाचा पार सार्वजनिक व्यासपीठ, भरायच्या जंगी सभा

Abhijeet Shinde

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर समरजीत घाटगे यांचे दसरा चौकात उपोषण

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा बँकेमार्फत तीन लाखांचे पिककर्ज बिनव्याजी

Abhijeet Shinde

मनपाडळेत माळरानावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

Abhijeet Shinde

घरगुती वीज बिल माफीसाठी 10 ऑगस्टला धरणे आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!