तरुण भारत

शिक्षण उपसंचालक कार्यालयात रंगले खेळ

कोल्हापूर/प्रतिनिधी

शिक्षण  उपसंचालक कार्यालयाच्या आवारात शनिवारी दुपारी फुटबॉल, जिबली, हॉकीसह विद्यार्थ्यांनी अन्य खेळ खेळत विद्यार्थी वाहतूकीच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

मुंबई उच्च न्यायालयाने असुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले आहेत.या निर्णयामुळे रिक्षातून लांब अंतरावरुन येणाऱया विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. शासनाने याबाबत मार्ग काढावा यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी चक्क कार्यालयाच्या आवारात खेळ खेळले.कार्यालयासमोरील रस्त्यावर फुटबॉल,हॉकीचा खेळ रंगला तर कार्यालयाच्या आवारात लहान मुलांनी एकमागोमाग धावून रेल्वेचा खेळ खेळला. मुलींनी जिबलीचा खेळ मांडला. तर विद्यार्थ्यांना गाढवावर बसवून प्रशासनाचा निषेध केला.या आंदोलनाने उपस्थितांचे लक्ष वेधले.कृती समितीच्या वतीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.विद्यार्थी वाहतूक बंद झाल्यास शाळेत जायचे कसे असा प्रश्न विद्यार्थी,पालक व कृती समितीने उपस्थित केला.

यानंतर शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे. न्यायालयाने आदेश दिले त्यावेळी पालक,विद्यार्थी आणि नागरिकांनी शासनाला निवेदन दिले आहे. शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन चालू शैक्षणिक वर्षाचा हा अंतिम टप्पा असून जून 2020 पासूनच्या शैक्षणिक वर्षापर्यंत या आदेशाला स्थगिती मिळावी अशी मागणी केली आहे. पण शासनाने अद्याप या निर्णयाबाबत काहीच हालचाली केल्या नाहीत.20 जानेवारी या निर्णयावर पुन्हा सुनावणी होणार असून त्यावेळी शासनाने कोणतीच हालचाल केली नाही तर विद्यार्थी प्रवासी वाहतूक बंद होणार आहे. या आंदोलनात समितीचे अशोक पोवार,रमेश मोरे,विनोद डुणुंग,लालासो गायकवाड,चंद्रकांत सूर्यवंशी,भरत रसाळे,रामभाऊ कोळेकर,अजित कसबे,भाऊ घोडके,दिपक गौड,अंजुम देसाई,चंचल देशपांडे,एस.डी.लाड,परवेज सय्यद,जयंत आसगावकर,रमा यादव,मेघा हावनूर,स्नेहा मोरे,सीमा जोशी,आयेशा मुजावर,साहील मुजावर,संजय पाटील,अमृत शिदे,अरुण हराळे,एस.के.माळी,अजित सासने यांच्यासह कृती कार्यकर्ते आणि शिक्षण नेते,शिक्षक सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांना गाढवावर बसवून आंदोलनात आणले

विद्यार्थी वाहतूकीवर मार्ग काढण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात लहान विद्यार्थ्यांना आणले होते.तसेच मुलांना गाढवावर बसवून त्यांना आंदोलनात आणले गेले.ही बाब नागरिकांना खटकणारी ठरली.आंदोलनात सहभागी शिक्षक नेत्यांना या बाबीचे भान नसावे याबाबत नागरिकात चर्चा सुरु होती.

Related Stories

कोल्हापूर : आभार फाटा ते शाहूनगर रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?

Abhijeet Shinde

कोल्हापुरात 12 जागा रिपाइं लढवणार : आठवले

Abhijeet Shinde

‘महाविद्यालयीन जीवनात कला, क्रीडा क्षेत्रालाही महत्त्वाचे स्थान’

Abhijeet Shinde

आता ‘कोरोनामुक्त गाव’ अभियान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : निगवे दुमालात मगरीचे दर्शन, दक्षता घेण्याचे वनविभागाचे आवाहन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाच्या काळातही उत्कृष्ट काम करणाऱ्या जि. प. शाळेसाठी सर्वोपरी सहकार्य करणार : ना राजेंद्र पाटील-यड्रावकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!