तरुण भारत

मुरमावरून मोटारसायकल स्लिप होवून एकाचा मृत्यू

करवीर/प्रतिनिधी

पुणेबंगलोर महामार्ग गोकुळ शिरगाव येथे महामार्गाच्या साईड पट्टीवर टाकलेल्या मुरमाच्या भराव्या वरून मोटरसायकल स्लिप होऊन दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमर सदाशिव कुरळुपे (वय-38, सध्या रा. गोकुळ शिरगाव, कागलेमाळ, मूळ रा. हेब्बाळ, ता. चिकोडी, जि.बेळगाव) असे या युवकाचे नाव आहे. आज, शनिवार दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

Advertisements

याबाबत माहिती अशी की, अमर हे गोकुळ शिरगाव एमआयडिसीमधील इंडो काउंट सुतमिल मध्ये काम करत होते. त्यांना आज सुट्टी असल्याने ते दुपारी आपली घरची कामे आटोपून आपल्या मोटरसायकलवरून पुणेबेंगलोर महामार्गावरून घरी येत होते. यावेळी नरसिंह सव्हिसिंग सेंटरच्या समोर सेवा रस्त्यावरून महामार्गावर येत असताना महामार्गाच्या शेजारीच साईड पाट्यांचा वर टाकलेल्या ठिसाळ मुरमामुळे त्यांची गाडी स्लीप झाल्याने ते महामार्गावर कोसळले. यावेळी पाठीमागून आलेल्या वाहनाची त्यांच्या डोक्याला जोराची धडक झाल्याने त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातावेळी इंडोकाउंट मिलमधील कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.

या अपघातास कारणीभूत असलेल्या महामार्गाने साईट पट्ट्या टाकलेल्या मुरमामुळे हा अपघात झाला असून याला जबाबदार कोण? शिवाय याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार अशी चर्चा यावेळी मिलमधील कामगार करत होते. अमर याच्यामागे दोन मुले व पत्नी व भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताबडतोप पंचनामा करून मृतदेह हालवून वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

पणुत्रे येथे शॉर्टसर्किटने ऊस पिकास आग,लाखोंचे नुकसान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दहशत माजवण्याच्या स्टेटसमुळे गुन्हेगाराचा खूनातील जामीन अर्ज झाला रद्द

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शाळांना प्रचलित धोरण लागू करा अन्यथा आंदोलन

Abhijeet Shinde

भरून पावलो, धन्य झालो..!

Abhijeet Shinde

मराठा समाजाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!