तरुण भारत

सांगलीत वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन; 15 राज्यातील विक्रेत्यांचा सहभाग

सांगली/प्रतिनिधी

सांगलीत 26 27 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे अधिवेशन होत आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापिठ परिसरात हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीला गती आली आहे. महाराष्ट्रासह देशातील पंधरा हून अधिक राज्याचे वृत्तपत्र विक्रेते एजंट सहभागी होणार असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता अधिवेशन 2020 च्या संयोजन समितीच्यावतीने देण्यात आली.

Advertisements

राज्य संघटना उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली व राज्य संघटना संचालक मारूती नवलाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन स्थळ निश्चितीसाठी संयोजन समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीस सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, संघटक सचिन चोपडे, कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, सरचिटणीस विशाल रासनकर, दत्तात्रय सरगर, अमोल साबळे, रामा कुंभार, देवानंद वसगडे, श्रीपाद पाटिल, नागेश कोरे यांच्यासह जिल्हा, शहर व तालुका संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीचा चौथा व महत्वाचा स्तंभ म्हणजे वृत्तपत्र! वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहचवणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्याचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. अनेक अडचणींवर मात करीत मध्यरात्रीनंतर, भल्या पहाटेपासून वृत्तपत्र वाचकांना घरोघरी पोहचवण्याचे काम करणारा कष्टकरी घटक. या सामान्य घटकाचे राज्यव्यापी देशपातळीवरील अधिवेशन सांगली नगरीत होत आहे. सांगलीकरांसाठी ही अभिमानची बाब आहे. या अधिवेशनाचे महत्व अनन्य साधारण आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने परिसंवाद, विचार मंथन आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

Related Stories

मिरजेत किल्ला भागातच उभारणार अद्ययावत न्यायालय

Abhijeet Shinde

सांगली : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

Abhijeet Shinde

नक्षलीविरोधी कार्यात उत्कृष्ट कामगिरी केलेला रोहित कोरोनापुढे मात्र हरला

Abhijeet Shinde

सांगली : वाळवा तालुक्यात प्रशासनाला कोरोनाचा हादरा

Abhijeet Shinde

सांगली : महापालिकेच्या चुकीच्या नाले दुरुस्तीचा जुना कुपवाड कॉलनीला फटका

Abhijeet Shinde

मनसेच्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकार्यांची मोर्चासाठी बैठक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!