तरुण भारत

सरकारने शेतकऱयांना विश्वासात घ्यावे : राजू शेट्टी

प्रतिनिधी / कोल्हापूर

भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱयांच्या विविध प्रश्नावर आणि सरसकट कर्जमाफीसाठी येत्या 8 जानेवारीला देशभर ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून बंद दरम्यान शेतकऱयांची काय ताकत आहे, हे सरकारला समजेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कर्जमाफीसाठी पैसे नसतील तर शेतकऱयांना विश्वासात घेवून मार्ग काढावा असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

Advertisements

शनिवारी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील होते.

ते म्हणाले, राज्यात सत्तेवर आलेल्या तीनही पक्षांनी सातबारा कोरा करण्याचे अभिवचन दिले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून जाहीरनाम्याची आठवण करुन दिली होती. त्यावेळी त्यांनी शब्द पाळणार असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष कर्जमाफी देताना एकाही शेतकऱयाला लाभ मिळणार नाही अशी घोषणा केली. ज्यावेळे हे नेते शेतकऱयांच्या बांधावर गेले त्यावेळी पीके महापुराने नष्ट झाली होती. या पिकांसाठी पीक कर्ज घेतले होते ही कर्जखाती मार्च 2020 ला थकबाकीत जाणार आहेत. मात्र सरकारने सप्टेंबर 2019 पर्यंत थकबाकीत असलेल्या खात्यांना कर्जमाफी देण्याची केलीली घोषणा फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवारांनी सातबारा कोरा झाला नाही तर पवार नाव लावणार नाही अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता अजित पवार कुणाचे नाव लावणार अशी बोचरी टीका त्यांनी केली.

शिवथाळी बाबत राजू शेट्टी यांनी तिखट शब्दा टीका केली. ते म्हणाले, शिवारात पिकवणाऱया शेतकऱयाकडे पहिले बघा जर शेतकऱयांचे शिवारच मोकळे पडले तर शिवथाळीमध्ये आणणार कोठून? शेवटी आयातच करावे लागेल, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.

यावेळी प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्डय़ाण्णावर, वैभव कांबळे, रमेश भोजकर, सागर शंभुशेटे, अजित पवा। जनार्दन पाटील, रमेश भोजकर

Related Stories

बालिंगे परिसरात गव्याचा वावर

Abhijeet Shinde

अत्यवस्थ कोरोना रुग्णाचा मृत्यू टाळण्यासाठी शेवटपर्यंत लढूया: मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरातील मुख्य मटण मार्केट राहणार बंद, जिल्ह्यात इतरत्र सुरूच राहणार

Abhijeet Shinde

‘हेल्पर्स’ पुरस्काराच्या अनिता दांडेकर ‘अपंगमित्र’ च्या मानकरी

Sumit Tambekar

खाटांगळेत आशा वर्करला ग्रामपंचायत सदस्यासह चौघांकडून मारहाण

Abhijeet Shinde

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी सक्रीय व्हावे : जिल्हाध्यक्ष संजय पवार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!