तरुण भारत

कोडोलीत यशवंत समूहाच्या वतीने बजरंग पाटील यांचा सत्कार

प्रतिनिधी / वारणानगर

कोडोली ता. पन्हाळा येथील यशवंत समूहाच्या वतीने नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार स्व. यशवंत दादाच्या आठवणीने जिल्हा परिषद अध्यक्ष गहिवरले.

Advertisements

पन्हाळा बावड्याचे तत्कालीन आमदार स्व. यशवंत ए. पाटील दादा यांनी राष्ट्रीय कॉग्रेसच्या माध्यमातून बजरंग पाटील यांना संधी दिली. पुन्हा यशवंत दादा निवडणूक हरले, मतदार संघाची रचना बदलली, त्यामुळे गगनबावडा तालुका करवीर मतदार संघात गेला. तरी देखील बजरंग पाटील माजी आ. पाटील यांचे व कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यानी काम केले. पक्षनिष्ठेचे फळ म्हणून बजरंग पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. तथापी हा कार्यकर्त्याला मिळालेला सन्मान पहायला आज माजी आ. यशवंत दादा असायला हवे होते, असे म्हणत अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कंठ दाटून आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यानी कोडोली येथील यशवंत समूहास आज दि. ४ रोजी शनिवारी भेट देत गुरुस्थानी असलेल्या माजी आ.स्व. यशवंत ए. पाटील दादा यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष पाटील यानी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रांगणातील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक स्व. प्रदीप पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. जयंत पाटील फौडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत इंगवले यानी स्वागत करून माजी आ. स्व.यशवंत दादा अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यातील आठवणी सांगून अध्यक्ष पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष पाटील यांचा यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

स्व. यशवंत एकनाथ पाटील यांनी मला राजकारणात सक्रिय केले असून त्यांच्या आशीर्वादामुळे व त्यांनी घालून दिलेल्या कामाच्या पद्धतीमुळे मी इथे पर्यंत पोहोचलो अशी भावना त्यांनी सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष पाटील यानी व्यक्त करून यशवंत दादाच्या आठवणी सांगतच त्याना गहिवरून आल्यासारखे होत होते त्यामुळे सर्वच वातावरण दादांच्या आठवणीने भावूक झाले होते.

सर्वोदय सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कुलकर्णी, संचालक पद्माकर गोसावी, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद गोडबोले, बी. डी. पाटील, बयाजी शेळके, सुरेश नारकर, मर्चंड पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी पाटील,सातवे गावचे उपसरपंच माणिक पाटील,यांच्या सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटील यांनी तर आभार पुंडलिक पाटील यांनी केले.

माजी सभापती अमरसिंह पाटील यांच्या घरी भेट

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यानी कोडोलीत माजी आमदार स्व. यशवंत ए. पाटील यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमरसिंह पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोदयचे चेअरमन लक्ष्मणराव कुलकर्णी, संचालक पद्माकर गोसावी, ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे या सह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Stories

अर्जुनवाड मधील मोबाईल चोरणाऱ्या महिलेला अटक

Abhijeet Shinde

इचलकरंजीत बीअर बारवर छापा ; मालकासह दोघांना अटक

Abhijeet Shinde

नांदणीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोन नातेवाईक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : खटांगळेतील एक जण कोरोना पॉझिटिव्ह ; ६४ जण संपर्कात

Abhijeet Shinde

महिला विकासासाठी जिल्हा परिषदेच्या योजना राबवू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी बी. बी. शिंदे यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!