तरुण भारत

नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत बुडून सिंधुदुर्गच्या तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी / शिरोळ

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आलेल्या सिंधुदुर्गच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. केशव सिताराम राऊळ (वय 26) रा. मळगाव तालुका सावंतवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता कृष्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Advertisements

याबाबत शिरोळ पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, मृत केशव सिताराम राऊळ व दत्तप्रसाद दिगंबर देवळी दत्त दर्शनासाठी श्रीक्षेत्र नरसिंह वाडी येथे आले होते. शनिवार दि 4 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कृष्णा नदीच्या पात्रात केशव राऊळ हा पोहत असताना अचानक पाण्यात बुडून मयत झाला. सदर घटनेची वर्दी दत्तप्रसाद देवळी यांनी पोलिसात दिली असून आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस हवलदार धुमाळे करीत आहेत.

Related Stories

वारणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. डी. टी. शिर्के यांचा कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बेजबाबदारपणे मोर्चा काढल्याप्रकरणी १४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

समीर वानखेडे मुस्लिमच असल्याचा काझी मौलाना अहमद यांचा दावा

Abhijeet Shinde

रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्था सलाईनवर

Abhijeet Shinde

खटावचे माजी सरपंच आनंदराव पाटील यांचा खून

Abhijeet Shinde

वाचनसंस्कृती वाढीसाठी बुकस्टॉलला भेट द्या : कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे 

Abhijeet Shinde
error: Content is protected !!