तरुण भारत

कासावलीच्या रेमेद सायबिणीचे उद्या फेस्त

वार्ताहर/ झुआरीनगर

गेल्या तिनशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा सांगणाऱया कासावलीच्या रेमेद सायबिणीचे फेस्त उद्या सोमवारी साजरे होत आहे. दरवर्षी जानेवारीच्या 6 तारखेला हे फेस्त साजरे करण्यात येते. प्रमुख म्हणजे केवळ अर्ध्या दिवसाच्या या फेस्ताला भाविकांची खूप मोठी गर्दी असते.

Advertisements

मुरगांव तालुक्यातील कासावलीच्या मुर्डी गावातील डोंगरमाथ्यावर निर्जनस्थळी अवर लेडी ऑफ रेमेडियोसचे सुंदर असे कपेल आहे. हे कपेल रेमेद सायबिणीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या फेस्ताचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘थ्री किंग्स मास्टर्स’ हे मास्टर्स म्हणजे तीन किशोरवीय मुले राजकुमाराच्या वेशात घोडय़ावर स्वार होऊन ठिक दहाच्या प्रार्थनेला उपस्थित राहतात. हा मान फक्त येथील कासावली, कुएली व आरोसीतील गावकार कुळातील मुलांनाच मिळतो. या थ्री किंग्सना ‘रे’ म्हणूनही संबोधले जाते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दहाच्या या प्रार्थना सभेला तुफान गर्दी उमटते. या उंचावर असलेल्या कपेलाकडून कासावली, आरोसी, कुएलीचा संपूर्ण भाग नजरेस पडतो. सध्या या कपेलाकडे जायला पक्का रस्ता आहे. परंतु हे थ्री किंग्स कपेलाकडे यायला ज्या पूर्वीच्या पारंपारिक वाटा होत्या त्या वाटेतूनच येतात. या वेगळय़ा परंपरेमुळे या फेस्ताला थ्री किंग्सचे फेस्त म्हणूनही संबोधले जाते. येथील काही जाणकारांच्यामते हे राजकुमार म्हणजे देवाचे दूत असून सुख आणि शांतीचे प्रतिक आहेत. या अनोख्या परंपरेमुळे गोव्यातील संपूर्ण ख्रिस्ती बांधवापर्यंत या फेस्ताची किर्ती पोहचलेली आहे. ख्रिश्चन बांधवाप्रमाणे हिंदू भाविकही या फेस्ताला येतात. मुर्डी गावात तर प्रत्येक हिंदूच्या घरातही गोडधोड पदार्थ बनवितात. पहाटे 5 ते दुपारपर्यंत या विशिष्ट वेळेतच हे फेस्त साजरे केले जाते. गेले नऊ दिवस नोव्हेनानिमित्त या निर्जनस्थळी जी भाविकांची वर्दळ होती ती उद्या सोमवारी दुपारपर्यंत संपुष्टात येणार आहे.

या फेस्ताचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे या फेस्ताला पारंपारिक वस्तू विक्रीस येतात. मातीची भांडी, कंदमुळे, बांबूच्या वस्तू, आपले पारंपारिक खाद्यपदार्थ विकले जातात. या फेस्ताची ही अनोखी परंपरा येथील लोकांची तशीच जपून ठेवलेली आहे. मागील काही वर्षात भाविकांची संख्या बरीच वाढलेली आहे. त्यामुळे या कपेलकडे जाणारा रस्ता रूंद केलेला आहे. त्यामुळे गाडय़ा थेट कपेलपर्यंत जातात. या ठिकाणी मोठय़ा जागेत गाडय़ांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पण काही भाविक अजूनही पायी चालतच जाऊन रेमेद सायबिणीचे दर्शन घेतात.

Related Stories

संसर्गजन्य रोगाच्या निर्मूलनासाठी जागरूकता महत्त्वाची-पिल्लई

Amit Kulkarni

‘त्या’ महिलेची ओळख उघड करणे अयोग्यच

Amit Kulkarni

माजी मुख्यमंत्री प्रा. पार्सेकर यांचा आज वाढदिवस

Patil_p

मोरजीत 69 वा वन्यजीव सप्ताह

Omkar B

विरोधी आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

Patil_p

फोंडा शहरातील दृष्टिहीन सीसीटिव्ही कॅमेरे बदलणार तरी कधी?

Patil_p
error: Content is protected !!