तरुण भारत

सोनी मराठीतर्फे सावित्रीजोती शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी फक्त स्त्राrशिक्षणाचेच नाही, तर संपूर्ण समाजाच्या विकासाचे कार्य केले आहे. फुले दाम्पत्याचे आयुष्य ही एक महागाथा आहे. समाजाने सुवर्णाक्षरात लिहून ठेवावी आणि वेळोवेळी उजळणी करावी अशी त्यांची जीवनकथा आहे. भारतातली पहिली शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाईंना मिळतो. तो मान मिळवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. सोनी मराठी या वाहिनीवर सावित्रीजोती ही मालिका आज 6 जानेवारीपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने सोनी मराठीने सावित्रीजोती शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

त्या काळच्या सनातनी समाजाच्या बंधनांना झुगारून सावित्रीबाईंनी स्वत:साठीच नाही तर इतर स्त्रियांसाठीसुद्धा प्रगतीचा मार्ग मोकळा करून दिला. सावित्रीबाई फुले यांना स्त्राrशिक्षणाची जननी म्हणणे चुकीचे ठरणार नाही. स्त्राrशिक्षणाच्या याच जननीची जयंती गेल्या 189 वर्षांपासून त्यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगाव येथे मोठय़ा उत्साहात साजरी होते. या जयंतीच्या निमित्ताने नायगाव येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमा होतो. सावित्रीबाईंच्या जन्मवाडय़ापासून ते गावातल्या पटांगणापर्यंत पालखी निघते. जयंतीच्या निमित्ताने गावात आलेले सर्व लोक या पालखीत सहभागी होतात. ही ज्ञानाची दिंडी पाहण्यास अतिशय नयनरम्य असते. यंदाच्या वर्षी सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱया सावित्रीजोती आभाळाएवढी माणसं होती या मालिकेतील समर्थ पाटील (छोटे जोतीराव) आणि तफषनिका शिंदे (छोटय़ा सावित्रीबाई) पात्रे साकारणाऱया बालकलाकारांनी या पालखीत सहभाग घेतला. दरम्यान, मालिकेचे मुख्य कलाकार अश्विनी कासार (मोठय़ा सावित्रीबाई) आणि ओमकार गोवर्धन (मोठे जोतीराव) हे देखील या जयंती सोहळय़ात उपस्थित होते.

Advertisements

18 व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा स्त्राrला एक व्यक्ती म्हणूनदेखील समाजात मान नव्हता, तेव्हा जोतीराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि इतरांना शिकवण्यायोग्य घडवले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक स्त्राr नोकरीसुद्धा करू शकते हे त्या काळातील रूढीवादी समाजाला दाखवून दिले आणि स्त्राr-पुरुष समानतेचे एक उत्तम उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले. पण, सावित्रीबाई आणि जोतीराव यांचे कार्य हे फक्त स्त्राrशिक्षणापुरते मर्यादित नव्हते. समाजात समानता नांदावी, स्पफश्य-अस्पफश्य हा भेद नाहीसा व्हावा यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केले. आपल्या वाडय़ातील विहीर गावातील अस्पफश्यांसाठी खुली केली हा त्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न. सावित्रीबाईंनी स्वत: शेणाचे गोळेदेखील अंगावर झेलले आहेत आणि वेळप्रसंगी समोरच्याला चांगली चपराकदेखील लगावली आहे. आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीर उभे असलेले आणि सर्व स्त्राr जातीच्या उद्धारासाठी कळकळीने काम करणारे जोतीराव त्या शतकातील काही मोजक्या पुढारलेल्या विचारांच्या पुरुषांपैकी एक होते. सावित्रीजोती या नावातसुद्धा सावित्रीबाईंचा उल्लेख प्रथम येतो. या आदर्श जोडप्याच्या याच सहजीवनाचा, त्याच्या कतफ&त्वाचा आणि पुढारलेल्या विचारांचा इतिहास सावित्रीजोती-आभाळाएवढी माणसं होती या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. सावित्रीबाईंच्या जन्मतिथीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीचे बिझिनेस हेड अजय भाळवणकर यांनी एसएनडीटी महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी सोनी मराठी सावित्रीजोती शिष्यवफत्ती या नावाने शिष्यवफत्ती घोषित केली.

Related Stories

‘ओएमजी2’मध्ये दिसणार यामी गौतम

Patil_p

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन

Rohan_P

हुमा कुरैशी उभारणार कोविड रुग्णालय

Patil_p

झोंबिवलीच्या शूटिंग दरम्यान सेटवर घेतली जात आहे काळजी

Patil_p

कलावंतांच्या समस्या दूर करणार – मंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीकडून समन्स

Rohan_P
error: Content is protected !!