तरुण भारत

स्टोक्सचा इंग्लंडतर्फे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम

वृत्तसंस्था/ केपटाऊन

अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने इंग्लंडतर्फे कसोटीच्या एका डावात सर्वाधिक पाच झेल टिपण्याचा विक्रम रविवारी नोंदवला. त्याने अँडरसनच्या गोलंदाजीवर नॉर्टचा झेल टिपत हा विक्रम गाठला. विशेष म्हणजे त्याने पाचही झेल स्लिपमध्येच टिपले आहेत.

Advertisements

इंग्लंडने याआधी 1019 कसोटी खेळल्या असून डावात चार झेल टिपण्याचा प्रकार 23 वेळा घडला आहे. गेल्या वर्षी कर्णधार जो रूटने लॉर्ड्सवर झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या कसोटीत चार झेल टिपले होते. स्टोक्सने इंग्लंडतर्फे विक्रम नोंदवला असला तरी विश्वविक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. पाच झेल टिपण्याचा प्रकार याआधी 11 वेळा घडलेला आहे. अगदी अलीकडे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 2017-18 मध्ये येथील मैदानावरच पाच झेल टिपले होते.

Related Stories

सुपरनोव्हाज-ट्रेलब्लेझर्स आज जेतेपदाची लढत

Patil_p

श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया

Patil_p

गोल्फ स्पर्धेत नदाल सहाव्या स्थानी

Patil_p

लाळ वापर बंदीची शिफारस तात्पुरती : कुंबळे

Patil_p

जोस बटलरच्या तडाख्यात हैदराबाद नेस्तनाबूत

Patil_p

रावळपिंडी कसोटीसाठी बांगलादेश संघ जाहीर

Patil_p
error: Content is protected !!