तरुण भारत

अँडरसनचे 5 बळी, सिबलीचे नाबाद अर्धशतक,

वृत्तसंस्था/ केपटाऊन

इंग्लंडने दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी चहापानावेळी दुसऱया डावात 2 बाद 109 धावा जमविल्या होत्या. पण शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडने 66 षटकांत 2 बाद 176 धावा जमवित 222 धावांची आघाडी घेतली होती आणि सिबलीने पहिले अर्धशतक नोंदवत यावेळी 59 धावांवर खेळत होता.

Advertisements

चहापानापर्यंत इंग्लंडतफे द.आफ्रिकेवर 155 धावांची आघाडी घेतली होती. पहिला सामना द.आफ्रिकेने जिंकला होता. पण या सामन्यात इंग्लंडने भक्कम स्थिती प्राप्त केली असल्याने हा सामना जिंकून बरोबरी साधण्याची त्यांना संधी मिळाली आहे. चहापानावेळी खेळ थांबला तेव्हा सिबली 44 व कर्णधार रूट 7 धावांवर खेळत होते. इंग्लंडने संथ खेळ करीत दुसऱया सत्रात 28 षटकांत केवळ 57 धावांची भर घातली. उपाहारानंतर त्यांनी फक्त जो डेन्लीचा (31) बळी गमविला. नॉर्टला हुक करण्याच्या प्रयत्नात तो प्रिटोरियसकरवी झेलबाद झाला.

इंग्लंडने या कसोटीच्या पहिल्या डावात 269 जमविल्यानंतर द.आफ्रिकेचा पहिला डाव 223 धावांत आटोपला. डीन एल्गार (88) व रॉसी व्हान डर डुसेन (68) यांनी अर्धशतके नोंदवली तर डी कॉकने 20 व फिलँडरने नाबाद 17 धावा जमविल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. इंग्लंडच्या अँडरसनने 40 धावांत 5 बळी टिपले तर ब्रॉड व करन यांनी प्रत्येकी 2 व नवोदित डॉमिनिक बेसने एक बळी मिळविला.

इंग्लंडच्या दुसऱया डावात झॅक क्रॉली (25) सर्वप्रथम बाद झाला. रबाडाने त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. या पूर्ण सत्रात एका बाजूने केशव महाराजने फिरकी मारा केला. त्याने खेळपट्टीवरील एक पॅच तयार झालाय त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळाले नाही. संघाचे शतक फलकावर लागल्यानंतर डेन्लीला नॉर्टने बाद केले. चहापानानंतर सिबलीने पहिले कसोटी अर्धशतक 140 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा 66 षटकांत 2 बाद 176 धावा जमविल्या होत्या. यावेळी सिबली 70 व रूट 40 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 269, द.आफ्रिका प.डाव 89 षटकांत सर्व बाद 223 : एल्गार 88 (180 चेंडूत 10 चौकार), व्हान डर डुसेन 68 (187 चेंडूत 7 चौकार), डी कॉक 20 (26 चेंडूत 2 चौकार), फिलँडर नाबाद 17 (58 चेंडू), अवांतर 7. गोलंदाजी : अँडरसन 5-40, ब्रॉड 2-38, करन 2-39, बेस 1-62.

इंग्लंड दु.डाव (66 षटकाअखेर) 2 बाद 176 : सिबली खेळत आहे 70, रूट खेळत आहे 40, क्रॉली 25, डेन्ली 31. गोलंदाजी : रबाडा व नॉर्ट प्रत्येकी 1 बळी.

Related Stories

हॉकी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी विनंती

Patil_p

श्रीलंकेचा क्रिकेट संघ गुवाहाटीत दाखल

Patil_p

ऑलिम्पिक क्रीडाज्योतीचा मुक्काम फुकुशिमामध्ये

Patil_p

अंकित, मनिष उपउपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

कनिष्ठ महिला हॉकी संघाची विजयाने दौऱयाची सांगता

Patil_p

लारा, स्टीन सनरायजर्सच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये

Amit Kulkarni
error: Content is protected !!