तरुण भारत

धारकऱयांनी मोठयासंख्येने सहभागी व्हावे

प्रतिनिधी/ बेळगाव

मधूमकरंदगड ते रसाळगड येथे काढण्यात येणाऱया गडकोट मोहिमेत ध्वजाचा मान बेळगावला मिळाला आहे. दि. 8 ते 12 जानेवारी दरम्यान मोहिम निघणार असून शहर आणि ग्रामीण भागामधून मोहिमेत मोठया संख्येने धारकऱयांनी सहभागी व्हावे. तसेच धारकऱयांनी शिस्तिचे पालन करून ध्वजाच्या मागून सर्वांनी जावे अशा विविध सुचना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केल्या.

Advertisements

गडकोट मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोहिमेसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. ध्वजाचे मानकरी धामणे येथील सचिन बाळेकुद्री यांच्याकडे आहे. मोहिमेत शहर आणि ग्रामीण भागामधून 40 हुन अधिक वाहने सहभागी होणार आहेत. मोहिमेवेळी हातलोट या गावी वाहने थांबवून पुढे गडाकडे मोहिम निघणार आहे. यावषीची मोहिम जावळीच्या धनदाट जंगलामधून जाणार असून मोहिम एकेरी मार्गाने जाणार असल्याने धारकऱयांनी शिस्तिचे पालन करणे बंधनकारक आहे. ध्वजाच्या मागे ध्वज पथक, शस्त्र पथकामध्ये बेळगावचे धारकरी असावेत. रसाळगड येथे मोहिमेची सांगता होणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका प्रमुख परशुराम कोकीतकर – 9741146448 यांना सपंर्क साधावा. धारकऱयांनी मोहिमेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किरण गावडे यांनी केले.

यावेळी तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, शहर अध्यक्ष अजित जाधव, विभाग प्रमुख किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, हिरामणी मुंचडीकर, मदन मुंचडी, महेश पाटील आदीसह विभागप्रमुख, गाव प्रमुख, धारकरी उपस्थित होते.

 

Related Stories

कोणत्याही परिस्थितीत महामेळावा होणारच

Amit Kulkarni

महापालिकेच्यावतीने वाल्मिकी जयंती साजरी

Amit Kulkarni

कर्नाटकचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी बेळगाव ईएसआय हॉस्पिटलची केली पाहणी

Rohan_P

हिंडलगा कारागृहात खबरदारी वाढवली

Patil_p

ग्रा. पं. साठी खानापूर तालुक्यात पहिल्या दिवशी एकच अर्ज दाखल

Patil_p

माळमारुती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!