तरुण भारत

तरुणांसाठी निवेदन क्षेत्रामध्ये अनेक संधी

पुणे / प्रतिनिधी  :  

मला माझ्या आई-वडिलांनी भरवशाची नोकरी सोडून त्याकाळी बेभरवशाच्या असणा-या निवेदनाच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सध्या अनेक संधी उपलब्ध असून यासाठी आजच्या तरुणांच्या पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी भावना प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली.

Advertisements
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र संस्थेच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मुलाखतकार सुधीर गाडगीळ, पार्श्वगायक जितेंद्र अभ्यंकर आणि कलाकार धनश्री काडगांवकर यांना केसरी वाडयातील लोकमान्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि ५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमात पितांबरी प्रॉडक्टस्ने तयार केलेले आयोकेन अ‍ँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते झाले. याशिवाय १०१ वर्षाचे सोपानराव कालेकर यांना उद्योग आदर्श रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर, डीआरडीओ चे शास्त्रज्ञ व्यंकटेश परळीकर यांना देखील त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. 

सुधीर गाडगीळ म्हणाले, मला आयुष्यात अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटल्या, त्यांच्यातील गुण माझ्यामध्ये कळत नकळतपणे उतरले. त्यांच्यामुळे माझे व्यक्तीमत्व घडले आहे. मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या असे मान्यवर आणि रसिक श्रोत्यांमुहे मी आज जिथे आहे तिथपर्यतचा प्रवास यशस्वीपणे  करु शकलो.

Related Stories

किल्ले राजगडावर शिवप्रेमींतर्फे पालखी सोहळा जल्लोषात साजरा

pradnya p

दत्तनामाचा जयघोष आणि पुष्पवृष्टीने दत्तजन्म सोहळा संपन्न

pradnya p

भारतीय रेल्वेने रचला इतिहास!

pradnya p

कोरोना संकटात योगा आवश्यक : तिजानी मोहम्मद बंदे

datta jadhav

शिवजयंती शिवसंस्कारांची…

pradnya p

आषाढीनंतर निर्बंधाची ‘कार्तिकी वारी’

Omkar B
error: Content is protected !!