तरुण भारत

एफआरपी द्या, अन्यथा तोडी बंद पाडणार : महेश खराडे 

प्रतिनिधी / सांगली

श्री दत्त इंडिया तसेच निनाईदेवी (दालमिया) या साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे बिले दिली आहेत. मात्र अन्य कारखान्यांनी 2400 रुपये प्रतीटन पहिली उचल देण्याचा घाट घातला आहे. या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी प्रमाणे बिले द्यावीत अन्यथा तोडी बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. खराडे यांच्या इशाऱयामुळे जिह्यात ऊस दर आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Advertisements

गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादकांचे झालेले नुकसान लक्षात घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दर आंदोलनात हात आखडता घेतला होता. त्यामुळे सहाजिकच एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी असतानाही साखर कारखानदारांनी या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतापाची लाट उसळली आहे. याबाबत बोलताना खराडे म्हणाले, एकरकमी एफआरपीची मागणी असताना त्याचे तुकडे करणे संघटनेला मान्य नाही. कारखानदारांनी ही मनमानी चालू दिली जाणार नाही.

जिह्यात केवळ श्री दत्त इंडिया आणि निनाईदेवी या दोनच साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे बिले दिली आहेत. उर्वरित कारखान्यांनी 2400 रुपये प्रतीटन पहिला हप्ता देण्याची तयारी केली आहे. जिह्यातील कारखान्यांनी मुद्दाम एक रकमी एफआरपी दिलेली नाहा, असे सांगत खराडे म्हणाले, आर्थिक अडचणी असत्या तर कोल्हापूर जिह्यातील कारखान्यांनीही एकरकमी एफआरपी  दिली नसती. दत्त इंडिया व दालमिया या कारखान्यांनी हाथ आखडता घेतला असता. पण या कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी प्रमाणे बिले दिली आहेत. येत्या आठ दिवसांत या कारखान्यांनी एक रकमी एफआरपी शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही खराडे यनी दिला आहे.

Related Stories

शिराळच्या गुंडाविरुध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : कोयना धरणावर मिळाला तब्बल नऊ फुटी अजगर

Abhijeet Shinde

आता घर बसल्या मिळणार नवरात्र संगीत मैफिलीची मेजवानी

Abhijeet Shinde

कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले आकाश दर्शनाचे धडे

Abhijeet Shinde

पुरग्रस्तांना मदतीचे पॅकेज जाहीर न झाल्यास तहसिलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा नेणार : मारुती चव्हाण

Abhijeet Shinde

इस्लामपूरच्या डॉ. वाठारकर याची सांगली कारागृहात रवानगी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!