तरुण भारत

जोकोव्हिक, नादाल यांची विजयी घोडदौड

वृत्तसंस्था/ सिडनी

ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एटीपी चषक पुरूषांच्या सांघिक टेनिस स्पर्धेत सर्बियाचा जोकोव्हिक तसेच स्पेनचा टॉप सीडेड राफेल नादाल यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

Advertisements

स्पेन आणि उरूग्वे यांच्यातील लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात स्पेनच्या नादालने उरूग्वेच्या क्युव्हेसचा 6-2, 6-1 असा पराभव करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी पहिल्या एकेरी सामन्यात स्पेनच्या ऍग्युटने उरूग्वेच्या रोनकॅडेलीवर 6-1, 6-2 अशी मात केली होती. 2020 च्या टेनिस हंगामात  15 दशलक्ष डॉलर्स एकूण बक्षीस रकमेची एटीपी चषक सांघिक पुरूषांची टेनिस स्पर्धा पहिल्यांदाच खेळविली जात आहे. या स्पर्धेत 24 देशांचा समावेश असून स्पर्धेतील सामने पर्थ, ब्रिस्बेन आणि सिडनी येथे खेळविले जात आहेत.

सर्बिया आणि फ्रान्स यांच्यातील लढतीत सर्बियाच्या जोकोव्हिकने पहिल्या एकेरी सामन्यात फ्रान्सच्या मोनफिल्सचा 6-3, 6-2 असा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या एकेरी सामन्यात फ्रान्सच्या पेरीने सर्बियाच्या लेजोव्हिकचा 6-2, 6-7 (6-8), 6-4 असा पराभव करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. दक्षिण आफ्रिका आणि चिली यांच्यातील लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने चिलीच्या गॅरीनवर 6-0, 6-3 अशी मात केली. ऑस्ट्रीया आणि अर्जेंटिना यांच्यातील लढतीत ऑस्ट्रीयाने अर्जेंटिनाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. ऑस्ट्रीयाच्या थिएमने चिलीच्या शुवार्झमनचा 6-3, 7-6 (7-3) असा विजय मिळविला. पर्थमध्ये झालेल्या लढतीत जपानने जॉर्जियावर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे.

Related Stories

27 क्रीडा फेडरेशन्सना क्रीडा मंत्रालयाची मान्यता

Omkar B

आशिया चषक टी-20 स्पर्धा जून 2021 मध्ये घेण्याचा विचार

Patil_p

पुण्यातील आर्मी केंद्रात होणार महिला बॉक्सर्सचे ट्रेनिंग

Patil_p

एकूण 10 क्रिकेटपटूंना किमान 2 कोटीची बोली

Patil_p

पाक कसोटी संघात फवाद आलमचा समावेश

Patil_p

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघाची घोषणा

Omkar B
error: Content is protected !!