तरुण भारत

स्पेनचा डेव्हिड ग्रँड जमशेदपूर एफसी संघात दाखल

वृत्तसंस्था/ जमशेदपूर

आयएसएलच्या उर्वरित मोसमात आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी स्पेनचा फॉरवर्ड डेव्हिड ग्रँडला जमशेदपूर एफसीने करारबद्ध केले आहे.

Advertisements

28 वर्षीय स्पॅनिश स्ट्रायकर ग्रँड सध्या स्पॅनिश थर्ड डिव्हिजन लीगमध्ये युनियनिस्तास एफसी संघाकडून खेळत आहे. या मोसमात पूर्ण बहरात असून त्याने आतापर्यंतच्या 18 सामन्यांत 9 गोल नोंदवले आहेत. जमशेदपूर एफसी प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जमशेदपूर संघात दाखल झाल्यानंतर डेव्हिड ग्रँड म्हणाला की, ‘भारतातील या महत्त्वाच्या क्लबसाठी खेळायला मिळणे ही माझ्यासाठी फार मोठी संधी आहे. या लीगच्या अव्वल चार संघात स्थान मिळवित प्लेऑफमध्ये संघाला पोहोचवण्यासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट मला प्रमुख प्रशिक्षकांनी दिले आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळविणे याला आमचे प्राधान्य असून त्यासाठी मी उपयुक्त योगदान देण्याचा प्रयत्न करेन,’ असेही तो म्हणाला.

जमशेदपूर एफसीचे प्रमुख प्रशिक्षक अँटोनिओ इरिओन्डो यांनीही क्लबने डेव्हिड ग्रँडला करारबद्ध केल्यानंतर आनंद व्यक्त केला. ‘स्पर्धेचा अर्धा टप्पा झाल्यानंतर आमच्या संघाचे आम्ही मूल्यांकन केल्यानंतर, काही विदेशी खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने संघाला संघर्ष करावा लागत असल्याचे आढळून आले. डेव्हिडसारख्या खेळाडूला सामील करून घेतल्याने संघाची खोली वाढली असून अधिक गोल नोंदवले जाण्याची शक्यताही वाढली आहे. तो प्रगल्भ आणि स्वतःला सिद्ध केलेला डावखुरा खेळाडू असून तो संघातील आघाडी फळीशी चांगला ताळमेळ साधून यश मिळवेल, असे आम्हाला वाटते,’ असे इरिओन्डो म्हणाले.

Related Stories

न्यूझीलंडच्या ऑलिंपिक पथकामध्ये तृतीयपंथीय ऍथलीट

Patil_p

जर्मनीच्या मुलेरला हंगेरी बरोबरचा सामना हुकणार ?

Patil_p

विनेश फोगटची शिबिरातून माघार

Patil_p

मँचेस्टर युनायटेड पुनरागमनात रोनाल्डोचे 2 गोल

Patil_p

रोममधील कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p

माजी कर्णधार सर्फराज अहमदला दंड

Patil_p
error: Content is protected !!