तरुण भारत

इंडो – ओमान संयुक्त कवायतींसाठी ओमान नौदलाच्या युद्ध नौका दाखल

प्रतिनिधी/ वास्को

इंडो-ओमान नौदलाच्या संयुक्त कवायतींना गोव्यानजीकच्या अरबी समुद्रात प्रारंभ होणार आहे. या कवायतींच्या पूर्वतयारीसाठी ओमान नौदलाची दोन लढाऊ जहाजे रविवारी मुरगाव बंदरात दाखल झाली. भारत व ओमानच्या नौदलामध्ये 93 सालापासून संयुक्त कवायती होत असून यंदा होणाऱया कवायती बाराव्या कवायतीं ठरणार आहेत.

Advertisements

  इंडो ओमान नौदलांमधील संयुक्त कवायतींना ‘नसीम अल बर्ह’ असे संबोधण्यात येते. ओमान रॉयल नेव्हीचे आरएनओव्ही अल रसिख व आरएनओव्ही खसाब या दोन युध्द नौका या कवायतींमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ही जहाजे भारतीय नौदलाच्या आयएनएस बिज् व आयएनएस सुभद्रा या लढाऊ जहाजांसोबत नसीम अल बर्ह संयुक्त कवायतींमध्ये पहिल्या टप्प्यात सहभागी होतील. ही जहाजे मुरगाव बंदरात दाखल होण्याच्या वाटेवर आहेत. दुसऱया टप्प्यातील संयुक्त कवायतीं खोल अरबी समुद्रात घेतल्या जातील. या कवायतींमध्ये ही सर्व जहाजे सहभागी होतील.

ओमान रॉयल नेव्हीचे आरएनओव्ही अल रसिख व आरएनओव्ही खसाब रविवारी मुरगांव बंदरात दाखल झाल्यानंतर ओमान नेव्हीचे कमांडींग ऑफिसर व इतर अधिकाऱयांनी भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल फिलीपोस पायनुमुटील यांची सदिच्छा भेट घेतली.

या संयुक्त कवायतींच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही नौदलाच्या जहाजांवर सदिच्छा भेटी, स्वागत समारंभ, दोन्ही नौदलांमध्ये भेटी, चर्चा, व्यवसायीक विषयांवर देवाणघेवाण, क्रीडा प्रकारांचे आयोजन, परिषदेचे आायोजन व इतर उपक्रमांचा समावेश असेल.

Related Stories

त्रिसदस्यीय प्रशासक समितीने घेतला गोवा डेअरीचा ताबा

Omkar B

कुडचडे येथे आज रक्तदान शिबिर

Amit Kulkarni

काँग्रेसचे धोरण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा

Amit Kulkarni

श्री ईस्वटी ब्राह्मण लक्ष्मी-नारायण मंदिराचा पुनःप्रतिष्ठापना वर्धापनदिन, पालखी उत्सव

Amit Kulkarni

आप’ म्हणजे भाजपची ‘बी’ टीम

Omkar B

गोव्यात ‘कोळसा हब’ होऊ देणार नाही

Omkar B
error: Content is protected !!