तरुण भारत

रस्ता करात सूट दिल्याने सरकारचाही फायदाच

प्रतिनिधी/ पणजी

राज्य सरकारने वाहन खरेदीवर वाहतूक करात 50 टक्के कपात केल्याने राज्य सरकारला अवघ्या 10 दिवसांतच रु. 3 कोटी 63 लाख 52 हजार 469 रुपयांचा वाहतूक कर आणि 13 कोटी 55 लाख रुपयांचा जीएसटी प्राप्त झाला अशी माहिती वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली आहे.

Advertisements

या प्रतिनिधीशी बोलताना माविन गुदिन्हो म्हणाले की, राज्यातील वाहन विक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्याशी संपर्क साधला व आणखी एकदा मुदतवाढ देण्याची मागणी केली. येत्या दि. 1 एप्रिल 2020 पासून देशभरात भारत-6 या पुढील नव्या तंत्रज्ञानाने विकसित अशी वाहने विक्रीस येतील. सध्या भारत-4 दर्जाची वाहने आहेत. ही वाहने कशी खपवायची! हा वाहन विक्रेत्यांसमोर प्रश्न पडलेला. गेल्या दोन तीन महिन्यात वाहने खपली नसल्याने काही विक्रेत्यांनी शोरुम बंद केले आहेत. परिणामी अनेक गोमंतकीय बेकार पडले असते.

राज्याच्या महसुलात भरच

50 टक्के सूट रस्ता करात दिल्यानंतर अवघ्या 10 दिवसांमध्येच प्रचंड पटीने वाहने विक्रीस गेली व राज्य सरकारलाही मोठय़ा प्रमाणात महसूल प्राप्त झाला. राज्याला खूप नुकसान झाले अशी जी कोणी ओरड मारत आहे व आरोप करीत आहेत हे सर्व अर्थहीन आहे. उलटपक्षी या योजनेतून राज्याच्या महसुलात भरच पडल्याचा दावा माविन गुदिन्हो यांनी केला.

एका महिन्यात 280 वाहनांची विक्री

दि. 18 ऑक्टोबर 2019 पासून 31 डिसेंबर 2019 पर्यंत अडिच महिन्यांसाठी योजना लागू होती. योजना सुरु करण्यापूर्वी 18 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर 2019 या एका महिन्यात 280 वाहनांची विक्री झाली त्यातून राज्याला 1 कोटी 99 लाख 66187 रुपयांचा वाहतूक कर मिळाला होता. रु. 4 कोटी 59 लाख 92390 रुपये जीएसटीचे मिळाले होते.

18 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या दरम्यान 833 चारचाकी वाहनांची विक्री झाली. राज्याला 3 कोटी 6352469 रुपयांचा वाहतूक कर मिळाला. शिवाय या काळात रु. 13 कोटी 55 लाख 40870 रुपयांचा जीएसटी मिळाला.

योजना लावल्याने कर महसूल, जीएसटीतही वाढ

दुचाकींच्या बाबतीतही हीच परिस्थिती होती. वाहतूक कर सवलत योजनेपूर्वी 1 महिन्यात 808 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. त्यातून 54 लाख 37 हजार 77 रुपयांचा वाहतूक कर प्राप्त झाला. आणि 1 कोटी 25 लाख 59959 रुपयांचा जीएसटी प्राप्त झाला. या उलट कर सवलत दिल्यानंतर 1555 दुचाकी वाहनांची विक्री झाली त्यातून 57 लाख 12690 रुपयांचा वाहतूक कर आणि रु. 2 कोटी 44 लाख 34997 रुपयांचा जीएसटी प्राप्त झाला.

हा केवळ 10 दिवसांमधील एवढा कर मिळाला. अद्याप उर्वरित दोन महिन्यांचे कराचे चित्र स्पष्ट व्हावयाचे आहे. या सवलतीमुळे राज्यालाच 10 कोटी रु.पेक्षाही जादा महसूल प्राप्त झालेला आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

Related Stories

शापोरा नदी पात्रातील पाणी वाढल्याने नदी किनाऱयावरील लोकात घबराट

Omkar B

मडगाव पालिकेकडून 60 लाखांची वसुली, पण समस्या कायम

Amit Kulkarni

शिथीलतेमुळे जनजीवन येतेय पूर्वपदावर

Omkar B

कोविडच्या महामारीमुळे गणेश चतुर्थीच्या खरेदीला मंदी

Patil_p

मोलेच्या संवर्धनासाठी मोलेकर, गोवेकर सक्षम

Amit Kulkarni

पाण्यासाठी कायसुव येथील ग्रामस्थ आक्रमक

Amit Kulkarni
error: Content is protected !!