तरुण भारत

कायद्याच्या तरतुदीनुसार कचऱयाची विल्हेवाट लावा

प्रतिनिधी/ बेळगाव

स्वच्छतेकरिताही भारतीय संविधानामध्ये कायदा आहे. त्यामुळे स्वच्छता राखण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे सांगत यापुढे निर्माण केलेल्या कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नागरिक आणि संबंधित संस्थांची आहे. यामुळे सर्व अधिकाऱयांसह नागरिकांनी कायदा जाणून घ्यावा आणि कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक प्रकारच्या कचऱयाची विल्हेवाट लावावी, असे आवाहन हरित लवादचे अध्यक्ष सुभाष आडी यांनी केले.

Advertisements

सर्वत्र 16 प्रकारचा कचरा निर्माण होतो. पण कचऱयाची विल्हेवाट कायद्यातील तरतुदीनुसार होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरत आहे. या कायद्याची माहिती देण्यासाठी सोमवारी महापालिका कार्यालयात शहरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकाऱयांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

हरित हवादचे अध्यक्ष सुभाष आडी यांनी स्वच्छतेसंदर्भातील कायद्याची माहिती दिली. ते म्हणाले, देशाचा विकास हवा असल्यास स्वच्छता आवश्यक आहे. या जबाबदारीपासून प्रत्येकजण लांब जात आहे. सध्या कचऱयाचे प्रमाण वाढले असल्याने शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडत आहे. याकरिता सुका, ओला आणि इ-कचऱयाचे विघटन करून स्वच्छतेच्या नियमावलीनुसार कचऱयाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. वनखात्याचा कचरा, हॉर्टिकल्चर कचरा, सभा संमेलनांमधील कचरा, फेरीवाल्यांचा कचरा, नारळ विपेत्यांचा कचरा, वैद्यकीय कचरा, प्लास्टिक कचरा असा विविध प्रकारचा कचरा तयार होतो. या कचऱयाची विल्हेवाट कशी लावावी याची माहिती सुभाष आडी यांनी दिली.

 ओल्या कचऱयापासून खत निर्मिती करावी किंवा हॉटेल, मंगल कार्यालय, सभा-समारंभ किंवा रहिवासी संकुलातील कचऱयापासून गॅस निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात यावी. जर कायद्यातील तरतुदीनुसार कचऱयाची विल्हेवाट लावली नसल्यास संबंधितांकडून दंड वसूल केला जाईल, असे सांगितले. बांधकामाचे टाकाऊ साहित्य रस्त्याशेजारी फुटपाथवर टाकले जाते. यामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे. हा कचरा टाकणाऱयांसाठी मनपाने आवश्यक सुविधा उपलब्ध केली आहे. उपलब्ध केलेल्या ठिकाणी टाकाऊ बांधकाम साहित्य टाकावे. याकडे दुर्लक्ष करणाऱया इमारत धारक, बांधकामधारकांकडून दंड वसूल करण्याची सूचना केली.

 शहर स्वच्छतेसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर्ड समिती स्थापन करण्याची गरज आहे. रहिवासी संघटना आणि स्वसाहाय्य संघटना यांच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती आणि देखरेख करण्याची गरज आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्याची सूचना मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांना केली. स्वच्छतेकरिता म्हैसूर महापालिकेला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. स्वच्छतेबाबत देशात अव्वल असलेल्या म्हैसूर महापालिकेत काम केलेले महापालिका आयुक्त बेळगाव महापालिकेला लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कार्यक्रम राबवून बेळगाव शहर स्वच्छ बनवा, अशी सूचनादेखील सुभाष आडी यांनी केली. 

Related Stories

पतीकडून पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून

Patil_p

सरकारी-खासगी क्षेत्रातील स्वच्छता कामगारांचे होणार सर्वेक्षण

Patil_p

बागायत खात्यामार्फत मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण

Omkar B

विद्युत मीटरचा तिढा सुटणार कधी ?

Patil_p

परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा अद्याप कायम

Amit Kulkarni

‘शिवचरित्र’ पारायणाला वाढता प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!