तरुण भारत

जेएनयू : आईशी घोषसह इतर 19 जणांविरोधात एफआयआर दाखल

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हल्ल्याप्रकरणी विद्यापीठ संघटना अध्यक्षा आईशी घोषसह इतर 19 जणांविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. 4 जानेवारी रोजी विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात आईशी घोष जखमी झाल्या आहेत.

Advertisements

विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱयांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, 5 जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह 19 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

 

Related Stories

बजेट 2020 : एलआयसीमधील भागीदारी केंद्र सरकार विकणार

prashant_c

पंतप्रधान मोदी सोमवारी वाराणसीत

Patil_p

विमानतळावर प्रथमच उतरले 189 सीटर बोईंग विमान

Patil_p

नियमित हप्ते भरणाऱयांना कॅशबॅक मिळण्यास प्रारंभ

Patil_p

17 वषीय भारतीय मुलाचे चिनी सैन्याकडून अपहरण

Amit Kulkarni

दिल्लीत 3,827 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!