तरुण भारत

सामाजिक जाणीव

एके काळी  सामाजिक जाणीव जागृत होती. त्या जाणिवेला जागून सर्व स्तरांमधले, सर्व वयाचे लोक आपापल्या मगदुरानुसार समाजाला कमीअधिक योगदान देत असत. ही जाणीव जागी ठेवण्याचं काम करणारं, समाजातील कमकुवत गटांना मदत करणाऱया कामाला तात्त्विक अधि÷ान देणारं आणि व्यक्तिगत जगण्यात समाजाचा विचार का हवा, याची मांडणी करणारं लिखाण त्या काळात होत असे. असलं लिखाण करणारे विचारवंत एक प्रकारे समाजाला वैचारिक मार्गदर्शन करत असत आणि समाजात त्यांना आणि त्यांच्या मांडणीला आदराचं स्थान होतं.

 आज आजूबाजूला पाहता, या  गोष्टी  पर्यावरणातून नाहीशा झालेल्या दिसतात. एका बाजूने समाजाला आपण काही देणं लागतो, ही भावना क्षीण झालेली आढळते आणि त्याच वेळी अशी भावना जागृत करणारं लिखाणही होताना दिसत नाही. एक प्रकारे समाज वाट चुकला आहे आणि त्याला वाट दाखवण्याचं काम करू शकेल, असाही कुणी सापडत नाही.

Advertisements

‘सामाजिक जाणीव’ असा शब्दप्रयोग केला, की काहीतरी तात्त्विक म्हणत असल्याचा आभास निर्माण होतो; पण भिकाऱयाच्या हातावर काहीतरी टेकवणाऱयाला आपल्यापेक्षा कमनशिबी माणसाला पदरचं काढून देणं हा ‘धर्म’ वाटत होता. हे खूप जुनं झालं. पन्नासपेक्षा जास्त वर्षांपूर्वीचं. चाळ सुटली आणि दारी येणारे हे लोक तुटले. रस्त्यावरचे भिकारी उरले. धर्म म्हणून देणं संपलं आणि दया म्हणून मागणं समोर आलं. आज मला मागणारे दिसतात आणि देणारे दिसतात. एक चमत्कारिक निरीक्षण असं, की तुलनेने कमी कमावणारा उत्स्फूर्तपणे देत असतो. त्याच्या मनात तो ‘धर्मभाव’ अजूनही जागा आहे. सुखवस्तू लोक खिशात हात घालत नाहीत. मुंबईसारख्या शहरात भीक मागणे हासुद्धा एक नीट आखलेला, नाटकाप्रमाणे बसवलेला उपक्रम आहे, याचे पुरावे मलाही माहीत आहेत. आणि मागणाऱयांपैकी कोण खरा गरजू, कोण धंदेवाईक, हे नुसतं बघून ठरवणं अशक्मय आहे, याचीही मला जाणीव आहे. पण मुद्दा मागणाऱयाचा नाहीच, देणाऱयाचा आहे. जसा आर्थिक स्तर उंचावतो, तशी पैशाची किंमत कळू लागते आणि नजर ‘खालून वर’ जाते. मग आपल्यापेक्षा कमनशिबी लोक दिसेनासे होतात; आपल्यापेक्षा सुस्थितीतले लोक डोळय़ांत भरत राहतात. पैसा वाचवणे, हा सहजभाव बनतो. हे गौडबंगाल मला नीटसं उलगडलेलं नाही. ही काय वर्गजाणीव आहे का? गरीब असताना भिकारी आपल्याच वर्गातले वाटतात, म्हणून त्यांना कनवाळूपणे मदत करायची बुद्धी होते? पटत नाही. ‘कमाई कमी असताना समाधान शोधण्याच्या जागा आणि पद्धती वेगळय़ा असतात; पण तेव्हाही पैशांमधून मिळणाऱया सुखांची जाणीव सुप्त स्वरूपात असते आणि क्रयशक्ती वाढताक्षणी ती जाणीव, ती वासना ज्वालेप्रमाणे उफाळून येते आणि तिला जेवढं प्राप्तीचं तूप घालावं, तेवढी ती जास्तच उफाळते?’ फार उथळ वाटतं. देण्यामधलं धर्म हे परिमाण आत्मधारणांमधून गमावलेल्यांसाठी सामाजिक जाणीव हे परिमाण आवश्यक आहे, हे मात्र लक्षात येतं.

धर्माचं कर्मकांड होतं आणि कर्मकांडाची परंपरा चालू राहते. जाणीव परंपरेसारखी आंधळी नसते. नजरेपुढे न मांडल्या जाणाऱया गरजूंचा विचार जाणीव करते. ही जाणीव निर्माण करण्याचं, तिला धार काढण्याचं, ती जागी ठेवण्याचं काम समाजातले विचारवंत करत असतात. अशा विचारवंतांची मोठी साखळी महाराष्ट्राच्या इतिहासात दिसून येते. अलीकडच्या काळात या साखळीचे दुवे निखळल्यासारखे वाटतात, हे खरं आहे. याला एकमेकात गुंतलेली अनेक कारणं आहेत.

आजच्या  जिण्याला भक्कम पाठबळ मिळतं ते नवश्रीमंत वर्गाच्या अपार राबण्यातून, स्ट्रेसफुल जगण्यातून, कायम स्पर्धेत राहिल्यामुळे होणाऱया दमछाकीतून, जीवनाचा उपभोग घेण्यासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी भरपूर कमावत राहायला हवंच, या असुरक्षित भावनेतून. हे लोक ‘सुखी’ असतील, ‘आनंदी’ किती आहेत हा प्रश्नच आहे.

Related Stories

प्रकटला विज्ञानाविष्कार

Patil_p

दिवस मतदार राजाचा

Patil_p

स्वच्छतेची नवी सुरुवात

tarunbharat

करिअर, बुध्दिमत्तेचे पैलू

Patil_p

सरकारी कनिष्ठ प्राथमिक शाळा, शाहूनगर

Patil_p

प्लास्टिक टाळणे जरूरी आहे !

Patil_p
error: Content is protected !!