तरुण भारत

अमेरिकेच्या सैन्याला इराणने ठरविले दहशतवादी

तेहरान

 अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च सैन्याधिकारी कासिम सुलेमानी मारला गेल्यावर आखाती देशात प्रचंड संताप पसरला आहे. या संतापाच्या स्थितीत इराणच्या संसदेने अमेरिकेचे सैन्य तसेच पेंटागॉनला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या बाजूने मतदान केले आहे. खासदारांनी सुलेमानी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव संमत केला आहे.

विधेयक संमत करण्यापूर्वी अमेरिका तसेच इस्रायलची निंदा करण्यात आली आहे. खासदारांनी सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेणे तसेच अमेरिका-इस्रायलला धडा शिकविण्याचा संकल्प घेतला आहे.

बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेची ही कारवाई इराणसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या कारवाईने पश्चिम आशियात नव्याने युद्धाचे ढग घोंगावू लागले आहेत. 

Related Stories

असा आहे इम्रानचा ‘नया’ पाकिस्तान

Patil_p

गडय़ा घरापेक्षा तुरुंगच बरा

Patil_p

हिंदूंवर हल्ला करू पाहणारा बांगलादेशी दहशतवादी जेरबंद

Omkar B

अध्यक्षांचा पुत्र घेणार लस

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 40 लाखांचा टप्पा

datta jadhav

ब्राझीलमध्ये 24 तासात 55 हजार नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!