तरुण भारत

नव्या मल्लांची मुसंडी, हीच कुस्तीची ताकद

शरद पवार यांचे मत, ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा

पुणे, नगर /  प्रतिनिधी   

Advertisements

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहेत. नवे मल्ल पुढे येणे, हीच कुस्तीची ताकद आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, माजी खासदार अशोक मोहोळ, परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे, नानासाहेब नवले, ऑलिंपिकवीर मारुती आडकर, बंडा पाटील, संभाजी वरुटे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आगामी ‘केसरी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते सुजय डहाके आणि कलाकार उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, यंदाची कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रची शान व जान आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी मल्ल तयार होतात. केसरीची गदा कोण पटकविणार, हे कालपर्यंत जे वाटत होते, त्या सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला आहे. दोन नवीन मल्ल यासाठी पुढे आलेले आहेत. हीच खरी कुस्तीची किमया आहे.

लांडगे म्हणाले, आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून कुस्तीसाठी एकत्र आले पाहिजे. आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुढे कशी नेता येईल, याचा विचार केला पाहिजे.

नगरच्या शिक्षकाच्या मुलाने मैदान मारले

मूळचा अहमदनगर जिह्यातील कोंभाळणे, तालुका अकोले येथील सुपुत्र असणारा मात्र नाशिक जिह्याचे प्रतिनिधित्व करणारा हर्षवर्धन सदगीर हा अहमदनगरमधील एका शाळेच्या प्रयोगशाळेतील लॅब शिक्षकाचा मुलगा आहे. हर्षवर्धनचे वडील शिक्षक असून त्याचे आजोबा नामांकित पैलवान होते.

हर्षवर्धन राज्यशास्त्राचा विद्यार्थी

हर्षवर्धन हा एमएच्या द्वितीय वर्षात शिकत असून, त्याने राज्यशास्त्र विषय घेतला आहे. पाच वर्षापासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावषी शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात त्याने पदक मिळवलेले आहे. तसेच वरि÷ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथेसुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे.

Related Stories

बेन स्टोक्सचा डरहॅमशी आणखी 3 वर्षांचा करार

Patil_p

मेजर ध्यानचंद चित्रपटाचे अभिषेक चौबे दिग्दर्शक

Patil_p

देवी परिवारातर्फे बालाजी ट्रस्टला 11 हजारांची देणगी

Patil_p

ब्राझिल, उरुग्वे संघांचे शानदार विजय

Patil_p

लंडन मॅरेथॉनमध्ये जेपकोसगेई, लिमा विजेते

Patil_p

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

datta jadhav
error: Content is protected !!