तरुण भारत

गोळावली येथील पट्टेरी वाघाच्या घातपाताचा संशय बळावला

वाळपई प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रांमधील गोळावली याठिकाणी रविवारी मृत अवस्थेत आढळलेल्या पट्टेरी वाघाच्या चारही पंजाची नखे गायब असल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे पट्टेरी वाघाचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्मयताही नाकारता येण्यासारखी नाही. अन्यथा त्याची नखे गायब होण्याचे कारण काय अशाप्रकारचा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

Advertisements

 यामुळे वनखात्याच्या यांच्यासमोर मोठा ताण निर्माण होण्याची शक्मयता असून यामध्ये गुंतलेल्या संशयितांना त्वरित गजाआड करण्याचे धाडस वनखाते दाखवणार का अशा प्रकारचा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. याबाबतची माहिती अशी की रविवारी पट्टेरी वाघाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आला होता. गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर गुंफा याठिकाणी पट्टेरी वाघाचा मृतदेह आढळला होता. सोमवारी करण्यात आलेल्या उत्तरीय तपासणी वेळी या चार वषीय पट्टेरी वाघाच्या चारही पंजाची  नखे गायब असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आलेले आहे. यामुळे अनेक स्तरावर संशय बळावला असून सदर पट्टेरी वाघाचा घातपात झाल्याची शंका आता दृढ झाली आहे.

 

नखांना जबरदस्त किंमत.

पट्टेरी वाघाच्या नखांना जबरदस्त किंमत बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेली आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये ही नखे घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू  आहे .त्यामुळे सदर नखांना मोठी किंमत असून अनेक ठिकाणी या नखांची तस्करी करणाऱया टोळीला गजाआड करण्यात आलेले आहे .तरीसुद्धा पट्टेरी वाघांच्या नखांची तस्करी अनेक ठिकाणी सुरू असल्याचे वारंवारपणे समोर आलेले आहे. आतापर्यंत देशांमध्ये वाघांची संख्या कमी होण्याचे एकमेव कारण असून गोळवली याठिकाणी मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेरी वाघाच्या पंजाची चारही नखे गायब असल्यामुळे सदर वाघाचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार असल्याची शंका आता दृढ झाली आहे. यामुळे सदर वाघाची शिकार तस्करी करणाऱयांकडून झाली असण्याची शक्मयताही नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे आता वनखात्यासमोर मोठी समस्या निर्माण झालेलीआहे.

सत्तरी तालुक्मयातील गोळवली या ठिकाणी पट्टेरी वाघाच्या मृत्यूनंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्यांच्यावर विषबाधा झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आल्याची ट्विट केल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे वनखात्याच्या  समोर मोठे आव्हान निर्माण झाले असून विषबाधा कशाप्रकारे झाली यासंदर्भाच्या तपास करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे .

दरम्यान आज दुसऱया दिवशीही वन खात्याच्या वेगवेगळय़ा पथकामार्फत कोम्ब?िग ऑपरेशन सुरू होते .सध्यातरी कोणत्याही प्रकारची संशयास्पद बाब आढळून आलेली नसून यामुळे वाघाच्या अवयवाचा अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत  वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार नसल्याचे समजते.

 दरम्यान सत्तरीतील नागरिकांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकार काळात राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने भागांमध्ये व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याच्या मंजुरीमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली असून तसे झाल्यास नागरिकांच्या राहणीमानावर मोठय़ा प्रमाणात निर्बंध येण्याची भीती व्यक्त केलेली आहे. सरकारने सर्वप्रथम वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी व त्यांच्या उपाययोजना करण्यासंदर्भात गांभीर्याने लक्ष द्यावे व नंतरच व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या संदर्भात पावले टाकावीत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सत्तरीतील नागरिकांनी व्यक्त केलेले आहेत. याबाबतची माहिती अशी की रविवारी पट्टेरी वाघाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वनखात्याच्या यंत्रणेमध्ये मोठय़ा प्रमाणात खळबळ निर्माण झाली होती. सोमवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱयांमार्फत उत्तरीय तपासणी करण्यात आली मात्र यासंदर्भात त्याच्या मृत्यूचे कारण उमगू शकले नाही .वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे प्रथमदर्शी अहवालात काही समजू शकले नसलेतरी त्यांच्या अवयवाचे नमुने सध्यातरी डेहराडून याठिकाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. जोपर्यंत सदर नमुन्यांचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या मृत्यूचे कारण निश्चित प्रमाणात स्पष्ट होणार नाही.

 

मुख्यमंत्री डॉ. सावंत याच्या टूविमुळे वनखाते सभ्रंमित.

 

दरम्यान गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये सदर पट्टेरी वाघाचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाल्याचे नमूद केल्याने वनखात्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे .यामुळे यासंदर्भात तपासणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले असून ते कोणत्या प्रकारे तपास करणार याकडे आता सर्वांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत. विषबाधेचा प्रकार कशाप्रकारे व कोणत्या आधारावर होऊ शकतो या संदर्भाचा प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधण्याचा गरजेचे आहे. विषबाधेचा प्रकार म्हणजे एकतरी विष प्रवाहित सापाने किंवा रानटी जनावराने त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्मयता आहे. किंवा दोन वाघांच्या भांडणात यावाघाचा मृत्यू होऊ शकतो अशा प्रकारचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

 दरम्यान दोन दिवसांपूर्वी अभयारण्याचे प्रमुख अधिकारी संतोष कुमार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नुसार गरज पडल्यास आपण स्थानिक नागरिकांची सुसंवाद साधून यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. यामुळे सध्यातरी नागरिकांशी खरोखर संवाद साधणार का अशाप्रकारचा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. तसे झाल्यास नागरिकांच्या रोषाला वनाधिकाऱयांना सामोरे जावे लागणार आहे .कारण गेल्या पंधरा दिवसांपासून या भागातील दोन गुरांची शिकार वाघाकडून करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील तक्रार व माहिती अभयारण्याच्या व्यवस्थापनाला देऊनसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची गंभीरता दाखविले नाही. यामुळे नागरिक सध्यातरी नाराजीच्या वातावरणात राहत आहे. यदाकदाचित वनाधिकाऱयांनी नागरिकांची वाघाच्या मृत्यु संदर्भात संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास यानागरिकांच्या रोषाला वनाधिकाऱयांना सामोरे जावे लागणार आहे.

 

व्याघ्रप्रकल्प हवाच कशाला?

दरम्यान सत्तरीतील नागरिकांनी व्याघ्रप्रकल्प हवाच कशाला अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यास आता सुरुवात केली आहे. म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात सात वाघांचा अधिवास असल्याचे आता सिद्ध झालेले आहे. यामुळे सध्यातरी एक वाघाचा मृत्यू झाल्यामुळे ही संख्या आता सहावर आली आहे. कों?बीग ऑपरेशनच्या माध्यमातून वन कर्मचाऱयांना एक वाघीण व त्यांचे दोन बछडे निवांतपणे फिरताना आढळून आलेले आहेत. यामुळे सध्यातरी गोळवली व परिसरामध्ये वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झालेले आहे. 1999 सङङङ म्हादई अभयारण्याची अधिसूचना जाहीर केल्यानंतर सत्तरीतील अनेक गावावर अनेक प्रकारच्या समस्यांचे संक्रांत निर्माण झालेले आहे. आता वाघ अस्तित्वात असल्याचे कारण पुढे करून सरकारने व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याचा प्रयत्न केल्यास दुसरे संकट सत्तरीवर उभे राहणार आहे. मध्यंतरीच्या काळात सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांचा समावेश पर्यावरणातील अतिसंवेदनशील भागात करण्यात आलेला आहे. यामुळे आता नागरिकांसमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. असे असतानाच व्याघ्र प्रकल्पाची सरकारच्या सल्लागार मंडळाची मंजुरी यामुळे येणाऱया काळात सत्तरीवर आणखीन संकट उभे राहण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे सरकारला खरोखरच व्याघ्र प्रकल्प कार्यान्वति करण्याची इच्छा असेल तर त्यांनी सर्वप्रथम अभयारण्याच्या नजीक असलेल्या गावांमधील नागरिकांच्या अनेक प्रकारच्या निर्माण झालेल्या समस्यावर उपाय योजना करावी व नंतर नंतरच यासंदर्भाचा विचार करावा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलेले आहेत.

Related Stories

मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या निवडणूकीत निलेश पटेकार यांना निवडून द्या- लवू मामलेदार

Amit Kulkarni

वाहतूक पोलिसांचे ‘दिसताक्षणी तालांव’ सत्र

Omkar B

शिक्षकांच्या पगारासाठी पैसा आणावा कुठून?

Patil_p

खासगी हॉस्पिटलांकडून कोरोनाबाधितांची आर्थिक फसवणूक

Patil_p

1.20 कोटी फसवणूक प्रकरण आज 14 रोजी मडगाव कोर्टात

Omkar B

वटपौर्णिमेचा उत्सव सत्तरी तालुक्मयात पारंपारिक पद्धतीने साजरा

Omkar B
error: Content is protected !!