तरुण भारत

बोडगेश्वर देवस्थानचा आज 27वा वर्धापनदिन

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वरचा 85वा महान जत्रोत्सव गुरुवार दि. 9 जानेवारी रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच देवस्थानचा 27वा वर्धापनदिन आज बुधवार दि. 8 जाने. रोजी साजरा होणार आहे.

Advertisements

दि. 8 जाने. रोजी श्री देव बोडगेश्वरच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 27व्या वर्धापनदिन महोत्सवानिमित्त सकाळी 10 वा. लघुरुद्र पूजा, आरती, दु. 1 ते 3 पर्यंत महाप्रसाद, सायं. 7 वा. सुहासिनीतर्फे दीपोत्सव, रात्री 8 वा. दारुकामाची अतिषबाजी, रात्री 8.30 वा. ॐ सत्य साई सेवा मंडळ म्हापसातर्फे प्रार्थना व भजन, रात्री 9 वा. कलेश्वर नाटय़ मंडळ नेरूल (कुडाळ) प्रस्तुत पौराणिक नाटक ‘गंगाजल’ सादर होणार आहे.

दि. 9 रोजी दु. 12 वा. श्री देव बोडगेश्वराचा 85वा महान जत्रोत्सव साजरा होणार असून सायं. 6 वा. भजन, रात्री 12 वा. पारंपरिक दशावतारी नाटक ‘भद्रकाली महिमा’ सादर होईल. दि. 10 रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. मोहन पोळे व साथींचे भजन, रात्री 11 वा. श्रींची आरती व प्रार्थना होऊन उत्सवाची सांगता होईल.

दि. 11 रोजी सकाळी 10 वा. पिकअप ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजन होईल. दि. 12 रोजी सकाळी 10 वा. म्हापशातील मासळी विक्रेत्या महिलांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजन. दि. 13 रोजी सकाळी 10 वा. रिक्षा-ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा व सायं. 5 वा. भजन होईल.

दि. 14 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा नगरपालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा व सायं. 5 वा. भजन होईल. दि. 15 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा व्हेजिटेबल व्हेंडर्सतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, सायं. 5 वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

 

Related Stories

विद्याप्रबोधिनी ताब्यात घेण्याचा भाजपचा मनसुबा

Omkar B

पणजी सहा पालिकांची रणधुमाळी आज संपणार

Amit Kulkarni

एकही गाव पाण्यासाठी तळमळू नये यासाठी प्रयत्न

Amit Kulkarni

कचऱयाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे

Patil_p

उद्यापासून गजबजणार कॅसिनो स्पा, मसाज पार्लरनाही सरकारची मान्यता

Patil_p

गोमेकॉ सुपरस्पेशालिटीमध्ये शंभर खाटांचे उद्घाटन

Omkar B
error: Content is protected !!