तरुण भारत

ओला,सुक्मयासह आता इ-कचरा जमा करणार

इ-कचरा जमा करण्यासाठी विशेष वाहन सुविधा

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

महापालिकेच्यावतीने शहरात ओला आणि सुका कचरा जमा करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र बाजारपेठेत इलेक्ट्रानिक मार्केट असल्याने इ-कचरा मोठा प्रमाणात साचत आहे. पण हा कचरा स्वतंत्ररित्या जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. इ-कचरा जमा करण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे.

मोबाईलप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात इलेक्ट्रानिक उपकरणांचा वापर वाढला आहे. पण सध्या उपकरणे वापरा आणि टाका  अशा प्रकाराची आहे. अलिकडील इलेक्ट्रानिक उपकरणांची दुरूस्ती करता येत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे सहज आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध होणाऱया इलेक्ट्रानिक उपकरणे घेण्याकडे कल वाढला आहे. यामुळे खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुक्मया कचऱयामध्ये टाकण्यात येतात. यामुळे इ-कचऱयाची विल्हेवाट लावण्याची डोकेदुखी महापालिका खशासनाला भेडसावत आहे. स्वच्छता आणि कचऱयाची विल्हेवाट लावण्याची माहिती राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष सुभाष आडी यांनी घेतली होती. तसेच ओला, सुका आणि इ-कचरा वेगळा जमा करण्याची सुचना केली होती. तसेच इ-कचरा साठविण्यासाठी इ-कचरा संकलन केंद्र सुरू करण्याची सुचना केली होती. यामुळे वंटमुरी आणि खासबाग अशा दोन ठिकाणी इ-कचरा संकलन केद्रे सुरू करण्यात आली आहेत. पण इ-कचरा कोण जमा करणार असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे इ-कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र वाहन सुविधा सुरू करण्यात आली असून स्वच्छता निरीक्षकांकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इ-कचरा असल्यास स्वच्छता निरीक्षकांना संपर्क साधल्यानंतर वाहन जावून इ-कचरा घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिले. वाहनांचा शुभारंभ सोमवार पासून करण्यात आला आहे. कलांमदिर परिसरातील व्यापाऱयांकडे इ-कचरा मोठया प्रमाणात साचल्याने जमा करून घेण्यात आला. जुन्या टी.व्ही.संच तसेच विविध प्रकारचा इ-कचरा जमा करण्यात आला.

 

Related Stories

रस्ते मोकळे करा, अन्यथा कारवाई

Rohan_P

किटवाडचा धबधबा घालतोय पर्यटकांना साद

Patil_p

सरीवर सरी… चिंता दाटे उरी!

Omkar B

खानापुरात 112 क्रमांकाबाबत माहिती फलकांद्वारे जागृती

Patil_p

सांडपाण्याचा त्रास छोटय़ा उद्योजकांना

Amit Kulkarni

प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शेतकऱयांचे अनोखे आंदोलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!