तरुण भारत

लोकमान्य पुरस्कृत स्पर्धेत शैला वीरूपाक्षी प्रथम

बेळगाव / प्रतिनिधी

महांतेशनगर येथील सीझन्स प्राईड लॉन येथे दि. 3 ते 5 जानेवारी दरम्यान ज्योती भाविकट्टी व विद्या निलजकर आयोजित सहेली शॉपिंग उत्सव पार पडला. दि. 4 रोजी रव्यापासून तिखट पदार्थ तयार करण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेची बक्षिसे लोकमान्य सोसायटीने पुरस्कृत केली आहेत. स्पर्धेत शैला विरूपाक्षी यांनी प्रथम, सुरेखा मम्मीगट्टी यांनी द्वितीय तर बीना कट्टी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी व मार्केटींग मॅनेजर किसन लाड यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

Advertisements

प्रदर्शनाच्या ठिकाणी काढण्यात आलेल्या भाग्यवान सोडतीचे एन. एस. कुरडे, वैजयंती काशीलकर आणि सुरेखा एम. एस. विजेते ठरले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृता शेडबाळकर, तेजश्री होसकळ्ळी, अभिजित घडशी, सचिन राऊळ, प्रशांत होनगेकर, शंकर किणीकर यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

साडेसतरा तास चालले गणेश विसर्जन सोहळा

Amit Kulkarni

बनावट खत विक्री कणाऱया गोडाऊनवर धाड

Omkar B

आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

Amit Kulkarni

खुनी हल्ला प्रकरणी तरुणाला अटक

sachin_m

जिल्हय़ाला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा

Amit Kulkarni

दुर्गम भागातील रस्त्यांसाठी वनखात्याचा अडसर थांबवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!