तरुण भारत

पारंपारिक बी-बियाण्यांबाबात कृषितज्ज्ञांनी दाखवलेली अनास्था चिंतनीय

ऑनलाइन टीम  / पुणे : 

 शेतीतून शाश्वत उद्दिष्ट साध्य करावयाचे असल्यास शेतीचे पारंपारिक ज्ञान आणि पारंपारिक बी-बियाण्यांना पर्याय नाही. त्या बी-बियाण्यांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असताना कृषितज्ज्ञ आणि कृषी धोरणकर्ते बी-बियाणे उद्योजकांना पूरक ठरतील अशी धोरणे आखत आहेत. ही धोरणे पाहता पारंपारिक बी-बियाण्यांबाबात कृषितज्ज्ञांनी दाखवलेली अनास्था चिंतनीय आहे, असे मत मुनीगुडा, ओरिसा येथील अग्रणी पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांनी व्यक्त केले. 
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकारातून विविध पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्यने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय १४ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज झाला, त्यावेळी ‘वसुंधरा सन्मान’ स्वीकारल्यानंतर डॉ. देबल देब बोलत होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आज देण्यात आलेल्या वसुंधरा सन्मानचे स्वरुप आहे. 
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेे अतुल किर्लोस्कर, विशेष अतिथी आदित्य कौशिक तसेच आरती किर्लोस्कर, गौरी किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देबल देब म्हणाले की, कृषितज्ज्ञ आणि कृषी धोरणकर्ते यांची धोरणे केवळ तांदुळच नव्हे तर केळी, बटाटे आदी उत्पादनांच्या बाबतीतही तशीच दिसून येतात. अति पाऊस, समुद्राचे पाणी, दुष्काळ किंवा केवळ पावसाच्या पाण्यावर तग धरू शकतील अशा प्रजाती आम्ही बासुधा फार्म्सच्या माध्यमातून विकसीत केल्या आहेत. त्याच्या बी-बियाण्यांच्या आदन-प्रदानाच्या माध्यमातून शून्य अवलंबित्वाकडे वाटचाल करीत आहोत. एकेकाळी भारतात अस्तित्त्वात असलेल्या तांदूळातील विविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि विकसित करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न चालू आहेत. जैविविविधतेचे स्थानिक ज्ञान आणि त्यावरील उपयोगांबद्दल केलेल्या अभ्यासातून मला असे वाटते की, केवळ पर्यावरणीय शेतीच नाही  तर पर्यावरणीय वास्तूशास्त्र, जैवविविधता आणि पर्यावरणाशी संबंधित जीवनशैली देखील टिकली पाहिजेे. त्यासाठी १९९७ मध्ये भारतातील सर्वात मोठी बिगर सरकारी बीज बॅंक अर्थात व्रिहीची स्थापना करण्यात आली आहे. व्रिही ही पूर्व भारतातील सर्वात मोठी, तांदूळ निर्यात करणारी जात आहे. ही बीज बॅंक, १४२० प्रकारच्या तांदूळ बीजांचे संगोपन करते आणि भारतातील १२ राज्यांमधील शेतकऱ्यांंना बीज विनामूल्य दिले जाते.

Related Stories

सुधीर गाडगीळ यांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा पुरस्कार जाहीर

prashant_c

भारतीय रेल्वेने रचला इतिहास!

pradnya p

महाराष्ट्राच्या अथर्व लोहार आणि देवेश भईया ला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

prashant_c

आनंद मेळाव्यातून चिमुकल्यांनी केले नववर्षाचे जल्लोषात स्वागत

prashant_c

भारताच्या सिमेवरील जवानांसाठी पुणेकरांकडून 200 किलो तिळगूळ

pradnya p

आषाढीनंतर निर्बंधाची ‘कार्तिकी वारी’

Omkar B
error: Content is protected !!