तरुण भारत

दीपिकाच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा, प्रकाश जावडेकर म्हणाले…

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दीपिकाने जेएनयूतील तुकडे-तुकडे गँग आणि अफझल गँगला पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजपचे नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी तिच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी दीपिकाच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले. यानंतर सोशल मीडियावर #boycottchhapaak हा हॅशटॅग टेंड होताना दिसत आहे.

Advertisements

या सगळय़ाविषयी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना प्रसारमाध्यमांकडून विचारणा करण्यात आली. दिपिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे आम्ही तिच्या सिनेमाला बॉयकॉट करत नाही असा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

ते म्हणाले, हा लोकशाही देश आहे. देशातील कोणताही व्यक्ती, कलाकार कुठेही जाऊ शकतो. स्वतःचे विचार मांडू शकतो.

 

Related Stories

मतदारांना लाच, खासदाराला शिक्षा

Patil_p

चिनी सैन्याच्या कुरापती सुरूच

Patil_p

लालूप्रसाद यादवांची प्रकृती बिघडली

Patil_p

चेन्नईमध्ये आणखी 12 दिवस वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

कोरोना : दिल्लीत 121 नवे रुग्ण; 214 जणांना डिस्चार्ज

Rohan_P

फर्टिलायझर सब्सिडीसाठी अतिरिक्त 28 हजार 655 कोटी

datta jadhav
error: Content is protected !!