तरुण भारत

पाटणे फाटा येथे मोटरसायकल अपघातात एक ठार

प्रतिनिधी/चंदगड

हलकर्णी आद्यौगिक वसाहतीमधील मेघा फॅक्टरीजवळून भरधाव वेगाने बुलेट मोटरसायकलवरून जाणाऱया एकनाथ हरिबा साळुंखे (वय.49) रा. वाघाळा कारखाना, ता. आंबेजोगाई, जि. बीड. हा जागीच गतप्राण झाल्याची वर्दी इंदू युवराज पवार यांनी चंदगड पोलीसात दिली.

Advertisements

एकनाथ साळुंखे हा पाटणे फाटा येथे धावडचे काम करत होता. मंगळवारी रात्री उशिरा तो जंगमहट्टीकडून पाटणे फाटय़ाच्या दिशेने बुलेट मोटरसायकलवरून भरधाव वेगाने जात असता मोटरसायकलवरील त्याचा ताबा सुटल्याने येथील मेघा फॅक्टरीच्या समोरील रोडच्या बाजुला असलेल्या झाडाला जोराची धडक बसली. त्यामध्ये त्याच्या डोकीला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेत असता तो गतप्राण झाला होता. घटनेची माहिती पाटणे फाटा येथील पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. चंदगड ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाचे शविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एकनाथच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. तपास पोलीस नाईक विश्वजित गाडवे करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत नव्या रूग्णांत 50 टक्के घट

Abhijeet Shinde

कोल्हापूर`मनपा’ची सत्ता सेनेच्या हाती येण्यासाठी प्रयत्नशील रहा – खा. मंडलिक

Abhijeet Shinde

कृषी, कामगार विधेयकात दुरुस्ती करावी

Abhijeet Shinde

कोडोलीचे रेव्हरंड सुमित्र विभूते यांचे निधन

Abhijeet Shinde

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी दोन कोटी 90 लाखांचा निधी

Abhijeet Shinde

गोकुळ फक्त शेतकरी उद्धाराचा केंद्रबिंदू असेल !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!