झारखंडच्या गिरिडीह येथे शोधमोहिमेच्या दरम्यान बुधवारी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाला 20 किलोग्रॅमचा आयईडी बॉम्ब हस्तगत झाला आहे. बॉम्ब यशस्वीपणे निष्क्रीय करण्यात आला असून संबंधित भागात शोधमोहीम राबविली जात आहे. गुप्तचरांकडून प्राप्त माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक सुरेंद्र झा यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबविण्यात आली होती.


previous post
next post