तरुण भारत

विश्वचषक स्पर्धेत प्रसिद्ध कृष्णा ‘सरप्राईज पॅकेज’ ठरेल

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे संकेत

इंदोर / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेत कर्नाटकचा मध्यमगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा ‘सरप्राईज पॅकेज’ ठरू शकेल, असे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी दिले. सध्या प्रसिद्ध कृष्णाचा अ संघात समावेश नसल्याने त्याला न्यूझीलंड दौऱयासाठी संधी दिली जाणार का, याची उत्सुकता आहे. प्रसिद्ध कृष्णा आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आला आहे.

सध्या भुवनेश्वर कुमार स्पोर्टस हर्नियामुळे तर दीपक चहर स्ट्रेस फॅक्चरमुळे मुख्य संघातून बाहेर आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याचे हे संकेत मानले जात आहे. ऑस्ट्रेलियात वेगवान व उसळत्या गोलंदाजीला पोषक वातावरण असल्याने आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रथम श्रेणी स्तरावर उत्तम चुणूक दाखवली असल्याने त्याला संधी दिली जाऊ शकते, असेही एकंदरीत चित्र आहे.

प्रसिद्ध कृष्णाने गतवषी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुपर मध्ये आपल्या दर्जेदार गोलंदाजीची चुणूक दाखवली होती. याशिवाय विजय हजारे चषक स्पर्धेत त्याने 19 बळीही घेतले. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची इकॉनोमी 8.6 इतकी, आहे ही एकच चिंतेची बाब आहे.

कर्णधार विराट कोहलीने यापूर्वी लंकेविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यानंतर नवोदित जलद गोलंदाज नवदीप सैनीचे देखील कौतुक केले होते. सैनीने त्या लढतीत दोन बळी घेतले होते. जसप्रीत, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर सैनी, असे पर्याय उपलब्ध असताना प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाल्यास त्याच्यासाठी ही नक्कीच महत्त्वाची बाब असणार आहे बुमराहने मागील लढतीत पुनरागमन केले असून उत्तम फॉर्म दाखवला आहे. त्यामुळेही जलद गोलंदाजीत विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताकडे अनेक पर्याय असणार आहेत.

Related Stories

दीपक कुमार, नवीन, ज्योती यांचे विजय

Patil_p

पुढील वर्षीही ऑलिम्पिक होणे कठीण : आयोजक

Patil_p

पाकचा बांगलादेशवर मालिका विजय

Patil_p

54 राष्ट्रीय फेडरेशन्सना मान्यता

Patil_p

ट्विटरवर पुन्हा ट्रेंड झाला #DhoniRetires हा शब्द

pradnya p

टाटा ओपनसाठी रामकुमारला वाईल्डकार्ड

Patil_p
error: Content is protected !!