तरुण भारत

‘नाटक’ हे असे माध्यम आहे की तिथे सत्य सांगितले जाते

प्रतिनिधी/ मडगाव

नाटक किंवा थिऐटर हे असे माध्यम आहे की, जिथे सत्य सांगितले जाते. आज आपल्या मनात, समाजात घडणारं नातं, जोडला गेलेला एक समाज, एक विचारधारा हे नाटक हेच माध्यम जिवंत ठेवऊ शकतं. आपल्याला वाटत नाही की, याच्यापेक्षा आणखीन कुठलीही माध्यमं सक्षम आहे असे मत प्रसिद्ध नाटय़कलाकार मकरंद देशपांडे यांनी मांडले.

Advertisements

गोमंत विद्या निकेतनच्या ‘विचार वेध’ व्याख्यान मालेत सतत नाटक या विषयावर ते बोलत होते. या वेळी ते पुढे म्हणाले की, आत्ता आपण बोलताना, तुम्ही ऐकताना, आपल्या दोघांमधील अंतर फार कमी आहे. येवढी जवळीक, येवढे जीवंत माध्यम, आपल्याला वाटत नाही आणखीन कुठलं असू शकेल. आणि गंमत बघा कशी आहे की, रंगभूमीवरून जे कलाकार सांगतो, त्यात प्रेक्षक रमून जातात. एक नाटक रंगभूमीवर, एक नाटक मनात, येवढय़ा ताकदीच माध्यम आहे हे.

कॉलेजमध्ये गेला तेव्हा मिलिंद इगळे ने सांगितले की, आपल्याकडे मराठी नट नाही आहे. सगळीकडे गुजराती लोकं आहेत. त्यावेळी मराठी वाड्मय होते पण, मराठी नाटकांला माणूस नाही, त्यांनी आमंत्रण दिले व आपण गेलो. नाही तरी आपल्याला क्रिकेट खेळायचे नव्हते. त्यांच्याकडे एक भूमिका होती. बंगालचा एक दिग्दर्शक होता. ज्यांनी महाराष्ट्रात खुप काम केलं होत. देहबोलीवरून त्यांनी आपली निवड केली. गिर्यारोहण करणे, कब्बडी खेळणे व क्रिकेट यामुळे शरीरयष्टी होती. जलदगती गोलंदाजाळा खेळाताना फलंदाज क्रिजच्या बाहेर उभा राहतो. हे आपल्याला कधीच आवडायचे नाही. आपण जेव्हा यष्टीरक्षण करतो, तेव्हा फलंदाज क्रिजच्या बाहेर असणे आवडायचे नाही. त्यामुळे आपण यष्टीमागे जवळ उभा राहायचो व जलदगती गोलंदाजीवर फलंदाजांना यष्टीचित करायचो. त्यावेळी हेल्मेट नव्हती, त्यामुळे बऱयाच वेळा बॉल लागला. एकदा तर दात सुद्धा तुटले. पण, आपण कधी घाबरलो नाही.

जेव्हा बंगाली दिग्दर्शकासोबत तालमीला गेला तेव्हा, त्यांनी तुम्ही लांब श्वास घेऊ शकता असे सांगितले व मोठ मोठे पल्लेदार डायलॉग मारू शकता. आवाज सुद्धा भक्कम होता. चांगली देहबोली होती. तालिम सुरू झाली. आंतर महाविद्यालयीन प्राथमिक फेरी झाली, तेव्हा दिग्दर्शकांनी सांगितले की, आपण अत्यंत आत्मविश्वासाने काम केलंय व आपले डायलॉग वाढवू या. आणि डायलॉग वाढविले. काही लोकांची कुंडली असते, ज्यांना ऍवार्ड मिळतात. आपल्याला नाही मिळाले ऍवार्ड. तेव्हा आपल्याला कुणी तरी सांगितले होते, ज्यांना आधी मिळत नाही ना, त्यांना नंतर खुप मोठा ऍवार्ड मिळतो. आज इथे आपल्याला बोलावलंय हाच आपल्यासाठी खुप मोठा ऍवार्ड आहे.

पं. सत्यजित दुबे यांच्याबरोबर आपले वेगळच नातं होतं. 1996च्या काळात ते म्हणाले होते की, मी तुमचे नाटक बघायला येईन. सतत नाटक करणाऱया माणसाचे शत्रू साधारणपणे कमी असतात. शत्रू हे तेव्हढय़ा पुरतेच असतात. शेवटी शत्रू असायला पण स्टेमिना लागतो आणि जो काम करतो त्याच्याकडे खुप स्टेमिना असतो. त्यावेळी आपण अनेक शत्रू पाहिले. शत्रू म्हणायचे की, हा नाटकातील एक ‘किड’ आहे. ते आपल्याला खुप लागले होते. पण, हे आपण प्रत्यक्षात ऐकले नव्हते, लोकांकडून ऐकले होते. त्यामुळे कुणाला दोषी धरणे योग्य नव्हते. आपण, त्या व्यक्तीचे नाटक पाहिले आणि त्यावर एक निबंध लिहिला. कारण नाटक आपल्याला आवडले होते. जेव्हा त्याला हे कळले, तेव्हा तो धावत आला आणि मिठी मारली आणि म्हणाला, आम्ही तर शत्रु आहोत, तुम्ही असे कसे लिहू शकता. ती आपल्यासाठी एक शिकवण होती स्वताच्या आयुष्यात. नुसते यश व धन यांच्याकडे न बघता, सत्य आणि सुंदरतेकडे लक्ष दिले तर आपला बहुअंगी विकास होऊ शकतो.

डॉ. श्रीराम लागू हे रंगभूमीवर का राहिले, कारण त्यांना सांगण्यात आले होते की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहिलात तर जेव्हढे तुम्ही दिसाल तेव्हढे रोल तुम्हाला मिळत राहतील. पन्नास पैकी एखाद्याच रोल तुम्हाला पाहिजे तसा मिळेल. उर्वरित एकोणपन्नास वेळा तुम्हाला किंमतीमुळे उभे रहावे लागेल आणि तेच रंगभूमीवर असताना तुमचे जे अस्तित्व आहे, त्याच्या बरोबर तुम्ही उभे राहू शकाल.

आपण नाटकांत येवढा रेमला की, आपल्या ठावूक सुद्धा नाही की, कधी काळी आपण एक उत्कृष्टपैकी क्रिकेटर होतो. नाटकाच्या पेमापोटी परीक्षेला सुद्धा बसता आले नाही. परिणामी नापास झालो. पण कॉलेजमध्ये पुन्हा प्रवेश घेतला व नाटकाबरोबरच अभ्यासावर भर दिला व परीक्षापण उत्तीर्ण झालो. जेव्हा कॉलेजमधून पासआऊट झालो, तेव्हा किती तरी नाटकात अभिनय केला होता. माध्यम नावाच्या संस्थेतून राज्य स्पर्धांत भाग घेतला. दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर कधी उशिरा तालमीला आले तर आपण तो सीन बसवून घ्यायचो, त्यामुळे दिग्दर्शक देखील झालो. त्यामुळे आपण डॉ. बांदिवडेकर यांचे आभारी आहोत कारण ते उशिरा तालमीला यायचे.

चित्रपटात भूमिका मिळू लागल्या, जेव्हा चित्रिकरणात मोकळा वेळ मिळायचा तेव्हा तो वेळ वाया जाऊ न देता आपण नाटक लिहायला घेतले, नाटक लिहून झाल्यावर त्याचे दिग्दर्शन व सादरीकरण सुरू झाले. हा प्रवास सतत चालू राहिला. कलाकाराला जसा वेळ मिळेल तसे आपण दिग्दर्शन करू लागलो. आज 54 नाटके लिहिली, त्याचे सादरीकरण झाले. नाटक हेच लोकांना जोडून ठेवणारे प्रभावी माध्यम असल्याचे मत त्यांनी मांडले.

Related Stories

गोमंतक मराठा समाजाच्या कलाकारांचे योगदान फार मोठे पं. कमलाकर नाईक यांचे उद्गार

Omkar B

पणजीत अडीच तासात अडीच इंच पाऊस

Amit Kulkarni

राज्यातील 14 हजार हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली येणार

tarunbharat

बेतूलसह सागरमाला अंतर्गतचे चार प्रकल्प रद्द

Omkar B

न्यायालयातील कर्मचाऱयांविरुद्ध सरन्यायाधीशांकडे तक्रार

Omkar B

रेखा पौडवाल यांनी साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!