तरुण भारत

चुकीच्या सर्व्हेमुळे गरीब नुकसानभरपाईपासून वंचित

प्रतिनिधी / बेळगाव :

यावषी मोठय़ा प्रमाणात महापूर आल्यामुळे अनेक जण बेघर झाले आहेत. अनेक शेतकऱयांच्या शेतातील पिके वाया गेली आहेत. असे असताना संबंधित अधिकाऱयांनी मात्र अनेकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. त्यामुळे गरिबांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्व्हे करून संबंधितांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुका पंचायतच्या बैठकीत करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तालुका अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

Advertisements

काही भागात तर तलाठी आणि ग्रामसेवकांनी पैसे घेऊन आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. नुकसानभरपाईसाठी गरीब अजूनही सरकारी कार्यालयांच्या पायऱया झिजवत आहेत. त्यामुळे यापुढे तरी असे न होता योग्य नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इंजिनिअरकडून खऱया लाभार्थ्यांची निवडच झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व्हे करून संबंधितांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

जलशुद्धीकरण केंदे दुरुस्त करा : चंदगडकर

बेळगाव तालुक्मयातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण केंदे उभारण्यात आली होती. मात्र, काही गावांत ती केंदे आता कुचकामी झाली आहेत. त्यांची दुरुस्ती करून ती पुन्हा कार्यान्वित करावीत. ज्या गावांत ही केंदे नाहीत त्या ठिकाणी पुन्हा बसावावीत. ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर यांनी सभागृहात मांडली. यावेळी कलादगी यांनी जलशुद्धीकरण केंद्रांची तातडीने दुरुस्ती करून ती सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले.  

Related Stories

शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p

एपीएमसी भाजी मार्केट दोन दिवस बंद

Patil_p

कलमेश्वरनगर हिंडलगा येथे हळदीकुंकू समारंभ

Omkar B

सोनोलीच्या महिलांचा बेळगुंदी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा

Patil_p

परंपरेनुसार कार्तिकी एकादशी उत्साहात

Patil_p

मुंबई येथील त्या घटनेचा बेळगावात दलित संघटनांकडून निषेध

Patil_p
error: Content is protected !!