तरुण भारत

एसबीआयची नवी योजना सादर

वृत्तसंस्था / मुंबई :

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांच्याकडून ग्राहकांसाठी ‘रेसिडेंशियल बिल्डर फायनास विद बायर गॅरेंटी स्कीम’ सादर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत घर खरेदी करणाऱयांना ग्राहकांना गृहकर्जावर सुरक्षा देण्यात येणार आहे. घराची किंमत जास्तीत जास्त 2.5 कोटी असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाना ही योजना लागू होणार आहे. या योजनेत आवश्यक त्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱया बिल्डरला एसबीआय 50 ते 400 कोटींचे अर्थसहाय्य करणार आहे.स्थावर मालमत्ता क्षेत्रात सध्या संथगती असून थकीत कर्जे लक्षात घेत बँकेने या क्षेत्रात सकारात्मता आणण्यासाठी ही नवी योजना तयार केली आहे. सदरची योजना ही एसबीआयकडून 10 शहरांमधील मंजुरी मिळालेल्या गृहप्रकल्पांसाठी लागू करण्यात येणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

घसरणीला बेक, शेअरबाजारांमध्ये मोठा वधार

Patil_p

अंबानी विदेशी बँकांकडून 14 हजार कोटींचे घेणार कर्ज

Patil_p

चालू आर्थिक वर्षात सरकारची दोन लाख कोटींची खर्च कपात?

Patil_p

रतन टाटांना मानहानीच्या दाव्यातून दिलासा

Patil_p

दूरसंचार कंपन्यांची खुल्या सुनावणीची मागणी

Patil_p

आयसीआयसीआय बँकेत 24 तास मिळणार नवी सुविधा

Patil_p
error: Content is protected !!