तरुण भारत

डॉ. पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता सावंत,अलका पांड्ये विजयी

ऑनलाइन टीम  / पुणे : 

भारती विद्यापीठ  ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘(आयएमईडी’) आयोजित  डॉ.  पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता सावंत (पीसीपी कॉलेज,पुणे ),अलका पांड्ये(आय एम ई डी ) प्रथम क्रमांकाने  विजयी झाल्या.  

९ जानेवारी रोजी ही वक्तृत्व स्पर्धा आय एम ई डी  च्या  पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये पार पडली .सुरेश पाटील(कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे ),शुभम जोशी(यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज )  यांना द्वितीय क्रमांक तर  यशवंत खाडे(स.प. महाविद्यालय ) ,प्रियांका माने(सिद्धिविनायक महिला महाविद्यालय) यांना तृतीय क्रमांक मिळाला.  

‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये ही स्पर्धा झाली. मराठी ,इंग्रजी गटातील विजेत्यांना रोख दहा हजार,सात हजार,पाच हजार अशी पारितोषिके अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकांना देण्यात आली.

Related Stories

आनंद मेळाव्यातून चिमुकल्यांनी केले नववर्षाचे जल्लोषात स्वागत

prashant_c

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन व सांगता मुख्य मंदिरातच

pradnya p

भारतीय रेल्वेने रचला इतिहास!

pradnya p

थंडीचा कडाका कमी

prashant_c

पुणे : बालकलाकारांनी वेशभूषेत येऊन केला रामनामाचा जयघोष

pradnya p

दिग्गज आणि तरुणाईने केले ‘वंचितांचे बोरन्हाण’

prashant_c
error: Content is protected !!