तरुण भारत

रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवाला शानदार प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव 

रोटरी क्लब बेळगाव आयोजित  अन्नोत्सवाला शुक्रवारपासून शानदार प्रारंभ झाला. येथील सीपीएड मैदानावर दि. 19 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे .या महोत्सवाच्या माध्यमातून खवय्यांसाठी मोठी पर्वणी लाभणार आहे . अनेक प्रांतामधील वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. तसेच या महोत्सवातून संकलित होणाऱ्या निधीचा विनियोग सामाजिक कार्यासाठी करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.या महोत्सवाचे उद्घाटन रोटरीचे ज्येष्ठ सदस्य कर्नल हेगडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष जीवन खटाव, इव्हेंट चेअरमन बसवराज विभूती, प्रमोद अग्रवाल ,संजय कुलकर्णी ,उमेश सरनोबत, कानोबा केळुसकर, शरद पै, अजित सिद्धण वर, डॉ. माधव प्रभू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिन 16 रोजी

Patil_p

प्रतिमा कुतिन्होच्या विरोधात गुन्हा दाखल

Patil_p

आंतरराज्य बससेवेसाठी निपाणी आगार सज्ज

Patil_p

नेहरूनगरमधील समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

बेळगाव-जोधपूर विमानसेवा लवकरच

Patil_p

कोरोना परवडला…पण फरफट नको….!

Patil_p
error: Content is protected !!