तरुण भारत

निर्भयाच्या गुन्हेगारांच्या याचिकेवर 14 रोजी सुनावणी

नवी दिल्ली :

निर्भया प्रकरणी चार गुन्हेगारांपैकी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंगने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. न्यायाधीश एन.व्ही. रमण, अरुण मिश्रा, आर.एफ. नरीमन, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांचे खंडपीठ 14 जानेवारी रोजी याप्रकरणी सुनावणी करणार आहे.

Advertisements

दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयाने निर्भयाच्या चारही गुन्हेगारांच्या विरोधात मंगळवारी डेथ वॉरंट बजावला होता. न्यायालयाने चारही जणांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फासावर लटकविण्याचा आदेश दिला आहे.

चारही गुन्हेगारांना तिहार तुरुंग क्रमांक 3 मध्ये फासावर लटकविले जाणार आहे. तीन गुन्हेगारांना तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. तर एका गुन्हेगाराला तुरुंग क्रमांक 4 मध्ये डांबण्यात आले आहे. निर्भयाप्रकरणी गुन्हय़ाच्या 2578 दिवसांनी डेथ वॉरंट बजावण्यात आले आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता. सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने गुन्हेगारांना मृत्युदंड ठोठावला होता. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालय तर मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंड कायम ठेवला होता.

 

Related Stories

पंजाब काँग्रेसमधील कलह सुरूच

Patil_p

युकी भांब्रीकडून प्रजनीश पराभूत

Patil_p

‘या’ राज्यात चक्क आरोग्य केंद्राची केली गोशाळा

Abhijeet Shinde

‘रेमडेसिवीर’ची उत्पादन क्षमता तिप्पट

datta jadhav

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

datta jadhav

शीशंगज गुरुद्वारात पोहोचले पंतप्रधान मोदी

Patil_p
error: Content is protected !!