तरुण भारत

आयएनएस विक्रमादित्यवर तेजस विमानाचे अरेस्टेड लँडिंग

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

 तेजस या स्वदेशी लढाऊ विमानाने शनिवारी पहिल्यांदाच आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर यशस्वीपणे अरेस्टेड लँडिंग केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) देखरेखीत ही चाचणी पार पडली आहे. कमांडर जयदीप मावळंकर यांनी हे लँडिंग करविले असून यामुळे नौदलाच्या ऑन डेक मोहिमेची क्षमता वाढणार आहे.

Advertisements

या अरेस्टेड लँडिंगनंतर नौदलाकरता दुहेरी इंजिनयुक्त तेजस लढाऊ विमानाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आयएनएसवर स्वदेशी लढाऊ विमानाने लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तेजसने मागील वर्षी 13 सप्टेंबर रोजी नौदलात सामील होण्यासाठी एक मोठी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. डीआरडीओ आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजेन्सीच्या अधिकाऱयांनी किनारी चाचणी सुविधेंतर्गत तेजसचे अरेस्टेड लँडिंग घडवून आणले होते. या लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजेंसीने केली आहे. भारतीय वायुदलाची 45 वी स्क्वाड्रन ‘फ्लाइंड ड्रगर्स’चा तेजस हिस्सा आहे.

अरेस्टेड लँडिंग म्हणजे काय?

नौदलात समाविष्ट होण्यासाठी विमानांकरता अरेस्टेड लँडिंग अत्यावश्यक असते. नौदलाच्या विमानांना अनेकदा युद्धनौकांवर उतरावे लागते. युद्धनौका निश्चित वजनच पेलू शकत असल्याने विमाने हलकी असणे गरजेचे आहे. याचबरोबर सर्वसाधारणपणे युद्धनौकेवरील धावपट्टीची लांबी निर्धारित असते. अशा स्थितीत लढाऊ विमानाच्या लँडिंगदरम्यान वेग कमी करत छोटय़ा धावपट्टीत थांबावे लागते. युद्धनौकांवर लढाऊ विमानांना रोखण्यासाठी अरेस्टेड लँडिंगची प्रक्रिया अवलंबिली जाते.

 

Related Stories

सुरतमधील दोन विद्यार्थिनींनी शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघुग्रह

datta jadhav

पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे साऱया देशाचे लक्ष

Patil_p

“आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदाराचा दावा धक्कादायक”

Abhijeet Shinde

राजस्थान-गुजरातमार्गे घुसखोरीचा पाकचा कट

Patil_p

केंद्र सरकारच्या ‘त्या’ दाव्यावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले…

Rohan_P

सहा दहशतवाद्यांचा खात्मा दोन जवानांना हौतात्म्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!