तरुण भारत

पंतप्रधान मोदी-ममता यांची भेट

वृत्तसंस्था / कोलकाता :

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शनांच्या स्थितीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱयावर आहेत. कोलकाता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. राजभवनात झालेली ही भेट सुमारे 20 मिनिटे चालली आहे. राज्याच्या हिस्स्याच्या 28 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यासह नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्दय़ावर चर्चा झाली आहे. या मुद्दय़ांवर स्वतःचा विरोध नोंदविल्याचा दावा ममतांनी केला आहे. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी मोदींच्या दौऱयाला विरोध केला आहे.

Advertisements

मोदींशी चर्चा केल्यावर ममता यांनी तृणमूलकडून आयोजित निदर्शनांमध्ये भाग घेतला. ममता दीदींनी नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआरचा मुद्दा उपस्थित केला असता मोदींनी याप्रकरणी चर्चेसाठी नवी दिल्ली येथे या असे सुचविले आहे.

मोदी आणि ममता बॅनर्जी रविवारी नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात सामील होतील.

कोलकात्यात ओल्ड करंसी बिल्डिंग, बेलवेडर हाउस, मेटकाफ हाउस आणि व्हिक्टोरिया मेमोरियल सभागृहाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक मंत्रालयाने या जुन्या आणि ऐतिहासिक इमारतींची दुरुस्ती केली आहे.  या ऐतिहासिक इमारतींच्या परिसरात सांस्कृतिक क्षेत्र निर्माण करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे.

 

Related Stories

केंद्र सरकारचा पुन्हा शेतकऱयांसमोर प्रस्ताव

Omkar B

गेल्यावर्षीपेक्षा यावेळी सज्जता अधिक

Patil_p

आता हैदराबादमधील 8 सिंहांना कोरोनाची लागण!

Rohan_P

निलंबित खासदार आंदोलनावर ठाम; उपसभापतीही करणार एक दिवसीय उपोषण

datta jadhav

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसण्यासाठी अधिकाऱ्याने सोडले धरणातून पाणी

Sumit Tambekar

वादग्रस्त दृश्यप्रकरणी कपिल शर्मावर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!