तरुण भारत

जयसिंगपुरात पोलीस ठाण्यातूनच 185 मोबाईल लंपास

प्रतिनिधी / जयसिंगपूर

येथील पोलिस ठाण्यामध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल 185 मोबाईल्स  फोन चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस प्रशासन हादरले असून शहरात चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महमद पटेल यांनी फिर्याद दिली असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे करीत आहेत.

Advertisements

याबाबत समजलेली माहिती अशी, गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्याच्या कारकून स्टोअर रूममध्ये अज्ञाताने आत प्रवेश केला. लोखंडी कपाटामधून विविध गुन्हे व कारवाईतील जप्त केलेले 185 मोबाईल फोन लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

या घटनेने पोलिस ही चक्रावून गेले आहेत.  शनिवारी सकाळी कोल्हापूर विभागाचे श्वानपथक व ठसे तज्ञ पथकास पाचारण करण्यात आले होते. शहर व परिसरात पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान इचलकरंजी आणि कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथक तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि पोलिस उपविभागीय कार्यालयचे पोलीस पथक याकामी विविध ठिकाणी तपासी यंत्रणा राबवत आहे. तसेच रेकॉर्डवरील संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

कोल्हापूर महापालिकेच्या ‘आपले बजेट’मध्ये आरोग्याची काळजी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हाळोलीत हत्तीचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वसगडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

Abhijeet Shinde

मण्यार’च्या विषाला सीपीआर’चा उतारा..!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

नांदणीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोन नातेवाईक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!