तरुण भारत

नदालच्या शानदार कामगिरीमुळे स्पेन अंतिम फेरीत

वृत्तसंस्था / सिडनी :

2020 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या एटीपी चषक सांघिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत टॉप सीडेड राफेल नदालच्या शानदार कामगिरीच्या जोरावर स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. स्पेन आणि जोकोव्हिकचा सर्बिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. सर्बियाने रशियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisements

स्पेन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील झालेल्या उपांत्य लढतीतील एकेरीच्या सामन्यात टॉप सीडेड राफेल नादालने ऑस्ट्रेलियाच्या डि मिनॉरचा 4-6, 7-5, 6-1 अशा सेटस्मध्ये पराभव करत आपल्या संघाला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. नादालने शानदार रॅलीसच्या जोरावर हा विजय मिळविला. या लढतीतील हा एकेरीचा सामना निर्णायक होता. दुसऱया उपांत्य लढतीत सर्बियाने रशियाचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरीत स्थान मिळविले. सर्बियातर्फे जोकोव्हिक आणि लेजोव्हिक यांनी एकेरीचे सामने जिंकताना अनुक्रमे रशियाच्या मेदव्हेदेव आणि कॅचेनोव्ह यांचा पराभव केला.

 

Related Stories

आयर्लंडचा झिम्बाब्वेवर मालिका विजय

Patil_p

केन रिचर्डसनची माघार अँड्रय़ू टायची निवड

Omkar B

माँटे कार्लो स्पर्धेतून गॅस्केटची माघार

Patil_p

मेमॉल रॉकी यांचा फुटबॉल प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Patil_p

भारतीय नेमबाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

Patil_p

वनडेतील कोहली, रोहितची स्थाने कायम

Omkar B
error: Content is protected !!