तरुण भारत

मिरजेत चाकूहल्ला करुन डॉक्टरला लुबाडले

प्रतिनिधी / मिरज

रेल्वे जंक्शनवर उतरलेल्या डॉक्टरला मिशन हॉस्पिटलजवळ सोडतो म्हणून रिक्षातून निर्जन ठिकाणी नेवून त्यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करुन 45 हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास करण्यात आला. यामध्ये डॉक्टरच्या हातावर चाकूचा गंभीर वार झाला आहे. याबाबत डॉ. दगडू बापू काळे (वय 35, रा. रामगुडवाडी, ता. खानापूर बेळगाव) यांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुध्द ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

गुरूवारी रात्री साडेआकराच्या सुमारास मिरज रेल्वे स्थानकावर आलेल्या डॉ. दगडू काळे यांना स्टेशनहून मिशन हॉस्पिटल चौकात जायचे होते. त्यासाठी त्यांनी एका †िरक्षा चालकाला गाठले. रिक्षा चालकाने त्यांना मिशन हॉस्पिटल चौकात सोडण्याचे सांगत रिक्षात बसविले. तत्पूर्वीच एक व्यक्ती रिक्षात बसलेला होता. रिक्षा सुरू होताच आणखीन एक तरुण येऊन रिक्षात बसला. चालकाने रिक्षा मिशन हॉस्पिटलकडे न नेता ती बोलवाड रस्त्याकडे वळविली. यावेळी डॉ. काळे यांनी विचारले असता जवळच्या रस्त्याने जात असल्याचे सांगितले.

दरम्यान, रिक्षातील तिघांनी मिशन हॉस्पिटलकडे न जाता गाडवे पेट्रोल पंपापासून पुढे बोलवाड रोडला रिक्षा निर्मनुष्य ठिकाणी नेली. त्यानंतर यातील तिघांनी डॉ. काळे यांना चाकू आणि त्रिकोणी लोखंडी रॉडने डोक्यात आणि छातीच्या डाव्या बाजूस मारहाण केली. चाकूने डॉ. काळे यांच्या मनगटावर गंभीर दुखापत झाली. लोखंडी रॉडचाही मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी तिघांनी त्यांच्याजवळील 20 हजार, 350 रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल, एटीएम कार्ड, रेशन कार्ड, पॅनकार्ड असा 24 हजार, 950 रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.

याबाबत डॉ. दगडू काळे यांनी पहाटे पाचच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तिनही आरोपी 30 ते 35 वयोगटातील असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारही तपासण्यास सुरूवात केली आहे. या प्रकारामुळे प्रवाशात मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्यावेळी रिक्षातून प्रवास करणे धोकादायक ठरू लागले आहे.

लुटमारीची मालिका

या आठवडय़ात रेल्वे स्टेशन, बस स्थानकसह शिवाजी रोडवर लुटमारीची मालिकाच सुरू आहे. आत्तापर्यंत अशा चार घटना घडल्या. यामध्ये स्टेट बँकेतील एटीएममध्ये महादेव धोंडीबा सातपूते या इसमास 32 हजार रुपयांना लुटण्यात आले. तर गोवा एक्सप्रेसमधील प्रवाशाचे अडीच तोळे दागिने लंपास केले होते. तर एसटी स्टँड चौकात एका मोटारसायकलस्वारास पाठलाग करुन लुटण्यात आले. त्यानंतर हा चौथा लुटमारीचा प्रकार उघडकीस आला आहे.

Related Stories

स्मशानभूमीतल्या कोरोना योद्धय़ाला मृत्यूने कवटाळले

Shankar_P

कर्नाटकातून आलेले दोघे मिरजेच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल

triratna

सांगली शहरातील काळ्या खणीचे भाग्य उघडले

triratna

पुराणकथांनी पुरुषांना स्त्रियांवर अन्याय करायला शिकवले – डॉ.तारा भवाळकर

triratna

सांगली शहरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

Shankar_P

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Shankar_P
error: Content is protected !!