तरुण भारत

पोरस्कडे पेडणे येथे रेती साठय़ावर कारवाई , बेकायदेशीर रेती फेकली परत नदीत

पेडणे / प्रतिनिधी  :

 उच्चषन्यायलयाच्या आदेशानुसार पेडणेचे मामलेदार अनंत मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱयाही दिवशी बेकायदा रेती उपसा आणि रेती साठय़ावर कारवाई करून 140  क्मयूबिक मीटर रेती तेरेखोल नदीत फेकण्यात आली .

Advertisements

     मामलेदार अनंत मळीक यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी कोनाडी येथील बेकायदा रेतीचे साठे  ठेवले होते त्यावर कारवाई करत 60  क्मयूबिक मीटर रेती नदीत फेकली  होती.  ही कारवाई चालूच ठेवताना शनिवारी  11 रोजी पोरस्कडे येथील 140 क्मयूबिक मीटर रेती तेरेखोल नदीत जेसीबीच्या साहाय्याने  फेकून देण्यात आली .

      पेडणे तालुक्मयातील तेरेखोल व शापोरा नदीत मोठय़ा प्रमाणात बेकायदा रेती उपसा चालू आहे . या अमर्याद रेती उपसामुळे नदीचे कठडे कोसळून मोठय़ा प्रमाणात बागायतीत शेतात पाणी घुसून आणि बागायतील झाडे कोसळून लाखो रुपये बागायतदारांना नुकसानी झाली आहे  . जशी बागायतींना नुकसान झाले त्याच प्रमाणे नदीवर असलेल्या पुलांनाही धोका निर्माण झाला आहे .  या विषयी पेडणेचे मामलेदार अनंत मळीक यांनी माहिती देताना उच्चन्यायालायच्या आदेशानुसार बेकायदा रेती उत्खन व बेकायदा  रेतीच्या साठय़ावर कारवाई करावी असा आदेश  दिला होता त्यानुसार खान भूगर्भ खाते यांनी मामलेदार मार्फत ही कारवाई केली असून 140  क्मयूबिक मीटर रेती    तेरेखोल नदीत यंत्राद्वारे फेकण्यात आली आल्याची माहिती दिली. ही कारवाई याही पुढे चालू राहणार असल्याचे मामलेदार मळीक  यांनी सांगितले .

यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त  उपस्थित होता .  किनारी भागातील रेतीचे साठे अचानक नदीत फेकले जात असल्याने   लोकांनी आचार्य व्यक्त केले .

      बेकायदा रेतीचे साठे तेरेखोल व शापोरा नदी किनारी मोठय़ा प्रमाणात  रेतीचे साठे साठवून ठेवले होते . काही साठे नदीपासून दूर ठिकाणी ठेवण्यात आले.  व्यावसायिकांना या बेकायदा रेती उत्खनावर कारवाई होणार यांचा सुगावा काहीना लागला होता . चार दिवसांपूर्वीच किनारी भागात जे मोठय़ा प्रमाणात साठे करून ठेवले होते ते इतरत्र हलवण्यात काहीना यश आले . त्यामुळे त्या साठय़ावर कारवाई होऊ शकली नाही .

Related Stories

अंजुणे धरणाने गाठली 86 मीटर इतकी पातळी

Omkar B

मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा, योग, व्यायाम, सकस आहाराची मात्रा

Patil_p

फोंडय़ातील कला मंदिरमध्ये ‘उत्सव रंगभूमीचा’ प्रदर्शन

Amit Kulkarni

कामगारांनी धरला परतीचा मार्ग

Amit Kulkarni

शिरसई सरपंचपदी गोकुळदास कांदोळकरांची निवड

Amit Kulkarni

मडगावात लाखो रुपयांच्या इलेक्ट्रीक यंत्रणेची चोरी

Patil_p
error: Content is protected !!